खळबळजनक ...सावत्र आईने दहा वर्षीय मुलाला...
गाढ झोपेत असलेल्या मुलाला आईने उचलून नेत हौदात बुडवून केली हत्या
सावत्र आईने १० वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातून उघडकीस आली आहे.
गाढ झोपेत असलेल्या मुलाला आईने उचलून नेत हौदात बुडवले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आईला अटक केली आहे. शिवमल्हार दयानंद घोडके (वय १० वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवमल्हार हा आपल्या
वडिलांसोबत घराशेजारील ज्योतिर्लिंग ज्वेलर्स दुकानासमोर झोपला होता. दरम्यान सकाळी उठल्यानंतर तो वडिलांना दिसून आला नाही. त्यामुळे दयानंद घोडके यांनी त्याचा शोध घेतला असता,
शिवमल्हार याचा मृतदेह जवळच सुरु असलेल्या बांधकामावरील हौदात आढळून आला. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. शिवमल्हारची हत्या झाली असावी,
असा संशय स्थानिक गुन्हे शाखेला आला. त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मृत मुलाच्या सावत्र आईला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला महिलेने उडवा उडवीची उत्तरे दिली.
मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली सावत्र आईने दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईवर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments