मोठी बातमी..जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख सोलापूर यांचे डोके ठिकाणावर आहे का ?
; चौकशी अहवालावर कारवाई करण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जाचे,माहिती अधिकारात उत्तर !
सांगोला प्रतिनिधी ; उप अधीक्षक भूमि अभिलेख, सांगोला या कार्यालयाबाबत वाढत्या तक्रारी तसेच प्रलंबित कामाचे अनुषंगाने दि.१७/१०/२०२३ रोजीच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे यांचे नियंत्रणाखाली
सांगोला उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयाच्या तपासणीकामी समिती गठीत करणेत आलेली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे यांचे कार्यालयाकडून दि.१८/१२/२०२३ रोजीच्या पत्राने तपासणी अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.
सदर तपासणी अहवालाचे अवलोकन केले असता उप अधीक्षक भूमि अभिलेख, सांगोला यांचे कार्यालयाकडून,नोंदवह्या अद्यावत नसणे, मुदतबाह्य मोजणी प्रकरणे, नियोजनात बदल करून प्रकरणे निकाली करणे,
ज्या महात मोजणी केली जाते त्या महात प्रकरणे निकाली होत नाही, क्रमसोडून मोजणी प्रकरणे निकाली करणे, प्रत्यक्ष मोजणी दिनांक व मोजणीच्या नोटीसीवर नमूद दिनांक यामध्ये तफावत
असताना मोजणी प्रकरणे निकाली करणे, मोजणी फी कमी भरून घेणे, फेरफार बारनिशी व फेरफार व्यतिरिक्त बारनिशी न ठेवणे, फेरफार प्रकरणांमध्ये मुदतीमध्ये कार्यवाही न करणे,
कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची नोंद ऑनलाईन आज्ञावलीमध्ये तात्काळ नोंदविले जात नाही, गांव नमुना नोंदवही अद्यावत न करणे इ. प्रमाणे अनियमितता झाली असल्याचे दिसून येते.
अश्या प्रकारच्या गंभीर त्रुटी असलेला तपासणी अहवाल प्राप्त झालेला आहे. सदर तपासणी अहवालाचे अवलोकन करून जबाबदार अधिकारी/ कर्मचारी यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल)
नियम १९७९ अंतर्गत कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपसंचालक भुमि अभिलेख ,पुणे प्रदेश पुणे यांनी संदर्भीय पत्रांन्वये आदेश दिला आहे.
तरी सदर आदेशानुसार उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय सांगोला येथील अधिकारी/कर्मचारी यांच्या विरूद्ध तातडीने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
अश्या आशयाचा अर्ज जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख सोलापूर यांच्या कडे दि.१३/२/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.
परंतु जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख सोलापूर या कार्यालयाचे जन माहिती अधिकारी तथा प्रमुख लिपिक यांनी जा.क्र.आस्था/मा.अ.अर्ज २८१/२०२४ दि.२०/२/२०२४ अन्वये पत्र देवून
,"विषय ;माहीतीचे अधिकार अधिनियम २००५ चे कलमतर्गत दिलेला अर्ज " व " संदर्भ ; आपला दि.११/२/२०२४ रोजीचा अर्ज " अश्या मजकूर नमूद करून अर्जदार यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
व दि.११/२/२०२४ रोजी रविवार होता.त्यामुळे जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख सोलापूर या कार्यालयाचे डोके ठिकाणावर आहे का ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.


0 Comments