google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अदिराज अबॅकस क्लासेस येथील नॅशनल लेवल अबॅकस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Breaking News

अदिराज अबॅकस क्लासेस येथील नॅशनल लेवल अबॅकस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

अदिराज अबॅकस क्लासेस येथील नॅशनल लेवल अबॅकस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला (प्रतिनिधी): आदिराज अबॅकस क्लासेस येथील नॅशनल लेवल अबॅकस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 9 मार्च रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी करण्यात आला. 

यावेळी व्यसपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष लोहारे सर (अध्यक्ष व सचिव मेट्रो ब्रेन एज्युकेअर प्रा. लि.) , प्रमुख अतिथी माननीय श्री प्रा. पी.सी .झपके सर( अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ) व माननीय मा.सौ.सीमा लोहारे मॅडम (संचालिका मेट्रोबेन एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड) प्रमुख उपस्थिती माननीय श्री ज्ञानेश्वर दिगंबर कोळसे पाटील सर(संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ सोनंद संचलित सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सोनंद) व माननीय श्री डॉक्टर एस के पाटील सर (प्राचार्य श्रीमती काशीबाई नवले बी.एड कॉलेज कमलापूर तसेच अध्यक्ष रोटरी क्लब सांगोला) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अबॅकस क्लासेसच्या संचालिका सौ दिपाली कोळसे पाटील मॅडम यांनी मांडले व या क्लासमध्ये घेण्यात येणारा मिड ब्रेन मेमरी कोर्स याचा दोन मिनिटांचा डेमो सादरीकरण लोहारे सर यांनी केले. अतिशय छान प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली.

प्रमुख पाहुण्याच्या मनोगतनंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मेट्रोबेन अबॅकस एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सलग सहाव्या वर्षी नॅशनल लेवल मेट्रोब्रेन अबॅकस परीक्षा  25 फेब्रुवारी 2024 लातूर या ठिकाणी घेण्यात आली होती

 या परीक्षेमध्ये आदिराज अबॅकस क्लासेस मधील पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शिवांजली सोमनाथ शिनगारे व आरोही सचिन चव्हाण या विद्यार्थिनींनी राज्यात मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

तसेच सानवी कांबळे ,रुद्र विभुते ,आरव लांडगे ,अदिराज कोळसे पाटील, रितेश राजवाडे या विद्यार्थ्यांनी लेवलनुसार  राज्यात प्रथम व दुसरा रँक  पटकाविला आहे

तसेच ,सोहम जाधव, प्रेम मिसाळ, श्रुती माळी ,सारा मोरे ,अनस इनामदार शिवांश शिंनगारे ,दिग्विजय जगताप स्वयंम बनसोडे भावना ,इंगोले यशराज इंगोले, 

राधेय शिरसागर ,आरुषी शिंदे प्रभास गोडसे, प्रचिती गोडसे ,आराध्या पवार राजलक्ष्मी इंगवले व अक्षरा नवले या विद्यार्थ्यांनी  Achiever रँक प्राप्त केला आहे. 

 सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्लासेसच्या संचालिका दिपाली कोळसे पाटील मॅडम यांना

 (Top Franchise of the year award -2024) देण्यात आला. मेट्रो ब्रेन कंपनीतर्फे उत्कृष्ट निवेदिका-2024 हा पुरस्कार श्री लोहारे सर यांच्या हस्ते क्लासेसच्या 

संचालिका दिपाली मॅडम यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण संपल्यानंतर पालकांचे मनोगत घेण्यात आले. संजय गव्हाणे ,शिनगारे ,सचिन चव्हाण या पालकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. . 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मेट्रो ब्रेन कंपनीचा लोगो अबॅकस व क्लासेस चे नाव अशी एक उत्तम रांगोळी कु. पल्लवी थोरात मॅडम यांनी काढली होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बालटे यांनी केले. 

आभार प्रदर्शन क्लासेसच्या संचालिका सौ दिपाली कोळसे पाटील मॅडम यांनी केले व त्यांनी येत्या पंधरा मार्चपासून अबॅकस क्रॅश कोर्स व मिड ब्रेन मेमरी कोर्स (डोळ्यावर पट्टी बांधून वाचणे व ओळखणे)सुरू होणार आहे

 याची पालकांना कल्पना दिली. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अनिल कोळसे पाटील ,आनंद बसवदे, प्रा. गणेश घेरडीकर सर, गणेश कपडेकर,पल्लवी थोरात मॅडम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments