मोठी बातमी..अनेक दिवसांची कामटे संघटनेची मागणी पूर्ण
कोल्हापूर -कलबुर्गी -कोल्हापूर रेल्वेस सांगोल्यात सोमवार पासून थांबा.
सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
रेल्वे क्रमांक 22155 व 22156 कलबुर्गी- कोल्हापूर- कलबुर्गी या रेल्वेस सांगोल्यात अधिकृत थांबा मिळाल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली.
याकरिता शहीद अशोक कामटे संघटनेने गेल्या वर्षापासून सांगोला थांबा मिळावा याकरिता
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर ,खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर
,जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत यांच्याकडे वारंवार समक्ष भेटून पत्रव्यवहार व पाठपुरावा केलेला होता याची संबंधितांनी दखल घेऊन सदरचा सांगोल्यातील अधिकृत थांबा मंजूर केलेला आहे.
याची अंमलबजावणी सोमवार दिनांक 11 मार्च 2024 पासून होणार आहे सकाळी 10 वाजून 53 मिनिटांनी कोल्हापूरकडे जाण्याकरिता
ही रेल्वे दररोज सांगोल्यात येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन पुन्हा ही रेल्वे कोल्हापूरकडे मार्गक्रमण करणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात सायंकाळी सांगोल्यात 6.13 मिनिटांनी येऊन दोन मिनिटाचा थांबा घेऊन कलबुर्गी प्रवासाकरिता निघणार आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे सर्व प्रवाशांना शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने व सांगोला रेल्वे स्टेशन मास्तरचे अधीक्षक सत्येंद्रसिंह यांनी केले आहे.
कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वेस सांगोला थांबा मिळाल्यामुळे येथील प्रवाशांना दररोज कोल्हापूर मिरज व कुर्डूवाडी सोलापूर अक्कलकोट व गाणगापूर कडे जाण्याकरिता चांगली सुविधा होणार आहे
तसेच हा थांबा मिळवण्याकरता सांगोल्यातील अनेक प्रवासी नागरिकांनी वेळोवेळी अशोक कामटे संघटनेस वेळोवेळी सहकार्य केल्याने सदरच्या पाठपुराव्यास यश आल्याचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
0 Comments