ब्रेकिंग न्यूज! लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात; आचारसंहिता 'या' तारखेच्या
आसपास लागू होणार; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली शक्यता
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात असून, १५ मार्चदरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे.
पोलिस विभागातील २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यातील १०९ जणांची त्यांच्याच जिल्ह्यात सहायक पदावर बदली झाली आहे. यात अनियमिता असल्याने अनेक जण मॅटमध्ये गेले आहेत.
यात अनियमितता असल्याने संबंधित बदल्या रद्द करून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्याबाहेर त्यांच्या नव्याने बदल्या करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी सोलापुरात दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. याच दरम्यान बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी त्यांची देखील मुख्य निवडणूक अधिकारी या पदावरून बदली झाली आहे.
त्यांच्या बदलीबद्दल त्यांना विचारले असता बदल्यांची सवय आहे, असे ते म्हणाले. प्रशासनात राहून बदल्यांची सवय लावून घ्यावी लागते.
नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम हे देखील पूर्ण ताकदीने काम करतील, असेही ते म्हणाले. गुरुवारी दुपारी नियोजन भवनच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तयारीची माहिती दिली.


0 Comments