google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकारणाच पावित्र्य राखण्यासाठी तरुणांनी निस्वार्थ पणे पुढे आले पाहिजे --डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख‌ ...

Breaking News

राजकारणाच पावित्र्य राखण्यासाठी तरुणांनी निस्वार्थ पणे पुढे आले पाहिजे --डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख‌ ...

राजकारणाच पावित्र्य राखण्यासाठी  तरुणांनी निस्वार्थ पणे पुढे आले पाहिजे --डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख‌ ...


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

   राजकारण हे समाजसेवेचे महत्वाचे माध्यम आहे.राजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करता येतात ,सामाजिक ऐंक्य अबधीत राखता येते .

 शेवटच्या घटकांना न्याय देता येतो हे सांगोला तालुक्याचे अकरा वेळा आमदार राहिलेले स्व.गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी सिध्द करून दाखविले.

   आशा‌ थोर व्यक्तींचे कार्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरुणांनी सकारात्मक विचार करुन समाजाची सेवा करण्याची राजकारणाकडे निस्वार्थ पणे वळले पाहिजे‌.

सध्या तरुणांचा राजकारणाडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आसुन.काही अपवादात्मक नेत्यांच्या कार्यामुळे राजकारणडे बघण्याचा

 दृष्टीकोन तरुणांचा बदललेला आहे ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरी काही चांगले लोक सुद्धा राजकारणामध्ये होऊन गेले आहेत व आजही आहेत.या लोकांचेच कार्य डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

निवडुन आलेले लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये व सभागृहाच्या बाहेर जो विनाकारण धुडगूस घालत आहेत हि बाब  लोकशाहीला बाधक तर आहेच,परंतु आशा नेत्यांमुळे पदांची मान -मर्यादा नाहिशे होत आहे.

विशेषता आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांवरती वाटचाल अरणारे राज्य आहे..इथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर आशा अनेक राष्ट्रपुरुषांच्या विचारावरती वाटचाल करणारे

 राज्य असुन त्या विचारांचा वारसा तरुणांनी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.भले राजकारणामध्ये काही नेते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून धन दौलत ,पैसा आडका मिळवून मोठे धनवान बोलत आहेत.

व सत्तेतुन पैसा व पैशातुन सत्ता मिळवणे हे काही नेत्यांचे समिकरण झाले आहे.आशा काही भ्रष्टाचारी नेत्यांच्यामुळे तर राजकारणाचा व्यवसाय बनु पहात आहे.

म्हणुन आशा गोष्टीचा विचार करून जर तरुण वर्ग राजकारणाकडे नकारात्मक नजरेने पाहत आसेल व स्वतःला राजकारणापासुन दुर ठेवत असेल तर हे ही अयोग्य आहे..

   राजकारणात चाललेली हि  बजबजपुरी पहाता व आशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणे हे आपल्यासाठी व गावांसाठी, 

राज्यासाठी परिणामी  देशासाठी घातक ठरू शकते.आसे  भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना व विचाराला तिलांजली देणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी.. 

गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या राज्याचा पुरोगामी विचार अंगी बाळगत समाजाच्या  हितासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केली पाहिजे.

    सध्याचा काळ जरी पुढारलेला...प्रगत...व इंटरनेटशी जोडलेला असला तरी व मानव चंद्रावर गेला असला तरी आपणास समाजीक सुधरणा करण्यासाठी आपणास

 आपल्याला समाजसुधारकांच्या .. राष्ट्रपुरुषांच्या कार्याची दखल घेऊन काम केले पाहिजे कारण सध्या जो विकास होतोय

 ना तो हा सर्वसामान्यांचा होताना दिसत नाही..उलट पक्षी आपले राष्ट्रपुरुषांचे कार्य व विचार हे सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजीक सलोखा निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहेत.

या साठी राष्ट्रपुरुषांचे कार्य व‌ विचार  तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी राजकारण हे उत्तम माध्यम आहे.जर हे विचार तळागाळापर्यंत पोहोचले की..आपोआपच राजकारणाच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल..

जे नेते स्वार्थापोटी विचारांना तिलांजली देतात ते तरुणांच्या दबावापुढे झुकुन राहतील..जर पुरोगामी विचारधारा जोपासली तर शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहचेल.

व‌ सामाजिक सलोखा समाजामध्ये नांदेल.या साठी तरुण वर्गांनी निस्वार्थ पणे राजकारणाकडे वळाले पाहीजे... सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे 

व राजकारणाचे पावित्र राखण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments