शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन .
छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वर्षानंतरही जयंती साजरी होत असल्याने या राजाचे कार्य महान होते :-रमेश पवार
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विलासराव पाटील सर व बाळकृष्ण टापरे (उद्योजक) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य आर एम पवार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वर्षानंतरही जयंती साजरी होत असल्याने या महान राजाचे कार्य फारच श्रेष्ठ व अतुलनीय होते,
त्याचबरोबर त्यांना दिलेली जाणता राजा ही पदवी खऱ्या अर्थाने योग्य असल्याचे त्यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण मनोगतातून व्यक्त केले . यावेळी प्रा. प्रसाद खडतरे ,विठ्ठलपंत शिंदे सर,
ॲड.हर्षवर्धन चव्हाण, चारुदत्त खडतरे ,मकरंद पाटील, सुयोग बनसोडे ,सचिन सपाटे, संतोष कुंभार ,अतुल बनसोडे, शहाजी पाटील यांच्यासह सर्व उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रसाद खडतरे यांनी केले. आभार प्रदर्शन नीलकंठ शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments