माझ्या यशामध्ये आई- वडील, कुटुंब,
गुरुजन, ग्रामस्थ यांचे योगदान मोलाचे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर
राष्ट्रपतीपदकाचे मानकरी वसंतराव बाबर यांचा चोपडी ग्रामस्थांच्या वतीने झालेला सत्कार सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी
सांगोला/ शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे 9503487812:( दशरथ बाबर) एका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या शैक्षणिक जीवनातील अनेक टप्पे पूर्ण करण्यासाठी माझ्या कुटुंबाची,
मित्र परिवाराची व चुलते वाय. एस .बाबर यांची साथ मोलाची ठरली .या सर्व परिस्थितीचा विचार करून एक उच्च ध्येय निश्चित
करून त्या दृष्टीने वाटचाल करीत पोलीस दलात दाखल झालो .कर्तव्याशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे जनसामानांच्या अडचणी प्रसंगी चांगली मदत केली .माझ्यासाठी कुटुंबाने दिलेले योगदान मोलाचे आहे.
सर्वसामान्य माणसांनी पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाने आले पाहिजे व गुन्हेगारांनी पोलीसदलाकडे तिरक्या नजरेने पाहू नये असे हे पोलीस दल आहे .सर्वसामान्यांच्या अडचणी प्रसंगी आपण मदत करणे,
उभे राहणे हे पोलीस दलात मोठे योगदान आहे .जन्मभूमीमध्ये गावकऱ्यांनी केलेला माझा सत्कार हा अविस्मरणीय व प्रेरणादायी जबाबदारी वाढवणारा आहे. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.
माझ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या ऋणात राहणे हे कर्तव्य समजतो. मला राष्ट्रपती पदक जाहीर झाले यामध्ये आई-वडील, कुटुंब, गुरुजन व ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे.
या सर्वांच्या योगदानातून पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त करुन मोठे यश संपादन करता आले .असे विचार चोपडी गावचे सुपुत्र राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी व्यक्त केले.
वसंतराव दादासाहेब बाबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे यांना पोलीस दलातील गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल चोपडी गावच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा चोपडी येथील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला .
याप्रसंगी, सत्कारमूर्ती वसंतराव बाबर हे बोलत होते .चोपडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य इब्राहिम तांबोळी सर हे होते.
पुढे बोलताना, वसंतराव बाबर म्हणाले मला मिळालेले राष्ट्रपती पदक हे चोपडी ग्रामस्थांचेच आहे. ग्रामस्थांनी केलेला सत्कार सोहळा हा अविस्मरणीय प्रेरणादायी व पुढील कार्यासाठी शक्ती देणारा आहे .
माझ्या या यशामध्ये चुलते वाय. एस .बाबर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट हे कधीही विसरू शकणार नाही व त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो. 27 वर्षाच्या नोकरी काळात सर्वसामान्यांची सेवा केली .
पोलीस दलात एक शिस्त काय असते हे अनुभवले. मला कोणाचा फोन आला अन तात्या हा शब्द उच्चारला की गावाकडचा व्यक्ती आहे असे समजून त्याची अडचण प्राधान्याने सोडवतो. गावाशी मी जोडला गेलो आहे.
गावातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एक लायब्ररी उभी करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाल्याने आता माझी मोठी जबाबदारी वाढली आहे.
गावकऱ्यांनी केलेला सत्कार ,दिलेले प्रेम व शुभेच्छा यामुळे मी भारावून गेलो आहे. असे प्रतिपादन यावेळी, राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी केले
निरीक्षक वसंतराव बाबर यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला हे गावचे मोठे भूषण आहे. गावामध्ये अनेक प्रकारची कामे झाली. सिद्धनाथ मंदिराच्या उभारणीमध्ये वसंतराव बाबर तात्या यांचे योगदान मोलाचे आहे .
गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी तात्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा व जीवनाची वाटचाल करावी .
राष्ट्रपती पदक मिळाले हा ऐतिहासिक क्षण येणाऱ्या पिढीसाठी स्फूर्तीदायक ठरणार आहे असे विचार अभियंता गणेश बाबर यांनी प्रस्ताविकामध्ये व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर, प्रकाश केंगार सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.एस. बाबर,
चेअरमन भिकाजी बाबर ,पतंगराव बाबर गुरुजी, डॉ.शिवाजीराव ढोबळे, सुरेश पवार गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, वसंतराव बाबर यांचा नागरिक सत्कार हा डोळ्याचे पाडणे फेडणारा असा आहे.
पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर उल्लेख होत आहे . हा गावच्या व तालुक्याच्या वतीने ऐतिहासिक क्षण आहे.
राष्ट्रपती पदक मिळाले ही गावासाठी अभिमानाची व कौतुकाची बाब आहे. यापूर्वी पोलीस महासंचालक पदक , मिळाल्याने त्यातून प्रेरणा मिळाली.
पुणे विभागात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून वसंतराव बाबर यांचा उल्लेख करणे हे आपले कर्तव्य आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर हे आपल्या कार्याशी व कर्तव्याशी प्रामाणिक व एकनिष्ठ आहेत.
सत्कारमूर्ती वसंतराव बाबर हे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन 1997 साली पोलीस दलात, दाखल झाले .27 वर्षात 351 बक्षीसे व 23 प्रशस्तीपत्रके प्राप्त केली.
हायस्कूल पासून पुढील शिक्षणामध्येही ते पहिल्या, क्रमांकाने यशस्वी व्हायचे. ते खो-खो. संघाचे कॅप्टन होते .मुंबई येथे पी.एस.आय पदावरती ते प्रथम रुजू झाले. त्यानंतर हळूहळू सांगली,
कोल्हापूर ,तासगाव, भिलवडी येथे कार्यरत होते. सध्या ते पुणे येथे सेवा बजावत असून वसंतराव बाबर हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती भवनाने घेतली
व त्यांना राष्ट्रपती पदक घोषित केले. हा त्यांच्यासाठी जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे. गावकऱ्यांसाठी स्वाभिमान आहे. मन ,मेंदू, शक्ती या त्रिशक्ती एकत्र असलेले व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव बाबर हे होत
वसंतराव बाबर यांचे कार्य पाहिले की एक आदर्श व प्रेरणा देणारे कार्य समोर येते . प्रशासन सेवेत लोकसेवेसाठी मोठे योगदान दिले .पोलीस अधिकारी, कर्मचारी व जनता यांचा समन्वय साधला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इब्राहिम तांबोळी सर यांनी आपल्या मनोगत सांगितले की ,शालेय जीवनापासून मी पोलिसांना घाबरायचो.
परंतु आज पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे माझी भीती दूर झाली आहे. पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली यातच मोठा आनंद आहे.
स्पर्धा परीक्षा किती महत्त्वाची आहे हे या पुरस्कारातुन पाहायला मिळते ..विद्याधन हे सर्वात मोठे असून त्याची चोरी होत नाही
किंवा वाटणी होत नाही. तात्यांनी घेतलेले कष्ट ,परिश्रम ,अनेक गोष्टीचा केलेला त्याग यामुळे त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
यावेळी, व्यासपीठावर बाळासाहेब देसाई विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंदराव बाबर, सरपंच मंगलताई सरगर उपसरपंच पोपटशेठ यादव ,चेअरमन भिकाजी बाबर,
माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.एस .बाबर माजी जि. प. सदस्य दादासाहेब बाबर ,डॉ.शिवाजीराव ढोबळे, सुरेश पवार गुरुजी, दादासाहेब बाबर, अनुसया बाबर ,सारिका बाबर उपस्थित होते .
चौकट :सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी कुलदैवत श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले.
त्यानंतर ग्रामदैवत मारुतीरायाचे दर्शन घेतले .तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले .
तसेच संत तुकाराम महाराज यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले .त्यांची गावातून, सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व बाळासाहेब देसाई विद्यालय या ठिकाणी अतिशय देखणा व नियोजनबद्ध सत्कार सोहळा संपन्न झाला .
सत्कार सोहळ्यानंतर संयोजकांनी उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजन देण्यात दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वेगवेगळ्या संस्थाचे पदाधिकारी, मान्यवर ,राजकीय नेते मंडळी ,युवावर्ग यांनी सत्कारमूर्ती वसंतराव बाबर यांचा सन्मान व सत्कार केला. कार्यक्रमासाठी बाळासाहेब यादव ,प्रगतशील शेतकरी
व उद्योजक सतीश पाटील ,पोलीस पाटील सीतादेवी पाटील, आबाशेठ बाबर ,बाळासाहेब देसाई विद्यालय महाविद्यालयाचे मुख्याध्यापक , के डी बाबर, डॉ .प्रतिभा बाबर,ग्रामपंचायत सदस्य ,मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते .
तसेच जय शिवराय कला क्रीडा व , सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वसंतराव बाबर तात्या यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मान्यवर ग्रामस्थ व युवकवर्ग यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य सुनील जवंजाळ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जनार्दन बाबर सर यांनी मानले.
चौकट : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावामध्ये लायब्ररी सुरू करण्यासाठी पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, अभियंता गणेश बाबर यांनी नियोजन हाती घेतले असून तालुक्यातील राजकीय मंडळींकडे यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये अडचणी आल्यास ग्रामस्थांच्या माध्यमातून लोकसहभागातून वर्गणीच्या रूपाने निधी जमा करून सुसज्ज व मोठे ग्रंथाल उभे करू असा
विश्वास अभियंता गणेश बाबर यांनी यावेळी दिला .चोपडी गावचे सुपुत्र समाधान कुंडलिक बाबर यांची कृषी विभागाच्या सहाय्यक अधीक्षक
पदावरती निवड झाल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रामचंद्र बाबर व आबाशेठ बाबर यांनी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली.






0 Comments