google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...महिलेला पोलिसांकडून मारहाण; पाणी मागितल्यावर लघवी पिण्यास सांगितले

Breaking News

धक्कादायक प्रकार...महिलेला पोलिसांकडून मारहाण; पाणी मागितल्यावर लघवी पिण्यास सांगितले

धक्कादायक प्रकार...महिलेला पोलिसांकडून


मारहाण; पाणी मागितल्यावर लघवी पिण्यास सांगितले

मगरपट्टा सिटीमध्ये घरकाम करणार्‍या महिलेवर चोरीचा आळ घेतल्यानंतर महिलेला पोलिस ठाण्यात बोलवत तिला तब्बल

 साडेचार तास हातपाय काळेनिळे होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एवढ्यावरही पोलिस थांबले नाहीत, महिलेने पाणी पिण्यास मागितले असता 

तिला लघवी पिण्यास सांगितल्याचा घृणास्पद प्रकार घडला. हा सर्व प्रकार मगरपट्टा सिटी येथील पोलिस चौकीत घडल्यानंतर समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

पीडित महिला ही मगरपट्टातील एका कुटुंबात घरकाम करते. त्यांच्या घरातून ऐवज चोरीला गेल्याची तक्रार घेऊन ते मगरपट्टा पोलिस चौकी येथे आले होते. त्यांची तक्रार ऐकल्यानंतर व त्यांच्या घरात घरकाम करणार्‍या महिलेवर त्यांनी चोरीचा

 संशय व्यक्त केला. त्यानंतर लागलीच घरकाम करणार्‍या महिलेला तिच्या मुंढवा येथील राहत्या घरातून उचलून मगरपट्टा पोलिस चौकीत घेऊन आले.

 तेथे पोलिसांनी तिला मारहाण केली. चोरी केल्याच्या संशयातून हातपाय काळेनिळे होईपर्यंत अमानुषपणे साडेचार तास मारहाण केली.

महिला घरी न आल्याने तिची विचारपूस करण्यास गेलेल्या नातेवाईकांचीही पोलिसांनी दिशाभूल केली. तिला मारहाणीची माहिती माध्यमांना दिली. 

याबाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली.

 तसेच महिलेला अशी वागणूक देणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. सह आयुक्तांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

अर्धा तास बसविले. पोलिस ठाण्यात घेऊन गेले आणि मला मारायला सुरू केले. मी त्यांना काका पाय दुखतात म्हटल्यावर त्यांनी आणखी मारहाण केली. 

या वेळी एका महिला पोलिसांसह पुरुष पोलिसांनी मारहाण केली. पाणी पिण्यास मागितल्यावर तर मला त्यांनी लघवी पिण्यास सांगितले.

– पीडित महिला

घडलेला प्रकार चुकीचा असून प्राथमिक चौकशीनंतर दोषी असलेल्या दोन महिला पोलिसांबरोबर एका पोलिस अधिकार्‍यावर

 गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments