google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘मी जिवंत आहे..’; निधनाच्या वृत्तानंतर पूनम पांडेची पोस्ट पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट

Breaking News

‘मी जिवंत आहे..’; निधनाच्या वृत्तानंतर पूनम पांडेची पोस्ट पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट

 ‘मी जिवंत आहे..’; निधनाच्या वृत्तानंतर पूनम पांडेची पोस्ट पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट


मुंबई : मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली होती. ही माहिती तिच्या व्यवस्थापकाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून दिली होती. 

पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले होते. या वृत्ताने पूनम पांडेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

दुसरीकडे, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर तिचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले होते. याच दरम्यान, पूनम पांडेने ‘मी जिवंत आहे’ असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ती जिवंत आहे आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हे केले गेले. या कॅन्सरने अनेक लोकांचा बळी घेतला आहे.

पूनम पांडेने गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन निवडला. 

२ फेब्रुवारी रोजी तिचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते. तर आता ३ फेब्रुवारीला पूनमची तब्येत बरी असल्याचा खुलासा झाला आहे.

Post a Comment

0 Comments