खळबळजनक प्रकार...गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांची हाणामारी
नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा, हे जणू आता समीकरण झाले आहे. आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमात अनेकवेळा तरुणांनी राडा केला आहे. मात्र यंदा जरा वेगळीच बातमी समोर आली आहे.
काल लातूरच्या उदगीर येथे गौतमीच्या संस्कृतीक कार्यक्रमाला चहात्यांनी तोबा गर्दी केली होती. दरम्यान गौतमीची अदा पाहण्यासाठी तरुणांसह तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात तरुणांसोबत तरुणीने देखील गौतमीला पाहण्यासाठी गोंधळ घातला. यावेळी महिलांमध्ये हाणामारीची घटनाघडली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे,
जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौतमीच्या उदगीर येथील कार्यक्रमात तरुणांसोबत मोठ्या प्रमाणात तरुणीही जमल्या होत्या.
मोठ्या संख्येने लोक जमल्याने अनेक महिलांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यातच बसण्याच्या जागेवरून काही महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.
0 Comments