google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे: राजेंद्र भोसले

Breaking News

मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे: राजेंद्र भोसले

 मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे: राजेंद्र भोसले


सांगोला प्रतिनिधी/(समाधान मोरे शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सोलापूर -27.2.2024 : मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. या भाषेला प्राचीन परंपरा आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व गोडवा यामुळे 

मराठी भाषा मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करते. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना साहित्यक्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. 

इंग्रजी भाषेच्या आक्रमणात प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा गोडवा जपला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक  राजेंद्र भोसले यांनी केले.

 माशाळे वस्ती येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने कवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 या वेळी मंचावर नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा संध्या दरेकर, सदस्य शंकरलिंग शटगार, ज्ञान प्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया कोळेकर, दीक्षित मॅडम उपस्थित होत्या. 

या वेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे गायन, काव्यवाचन, गीत सादरीकरण करुन, मराठी भाषेला अभिवान केले. कवी सुनील बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करून आपली कविता सादर केली.  

    सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय बिराजदार मॅडम यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी जमादार यांनी केले. आभार सिद्धगणेश मॅडम यांनी मानले.

 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रत्नाकर होटगे व सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  

फोटोओळ:-डावीकडून-

शामल दिक्षित ,कवी सुनील बिराजदार, राजेंद्र भोसले,शंकरलिंग शटगार ,छाया कोळेकर, संध्या दरेकर ,अर्चना वाघमारे आदी 

कवी सुनील बिराजदार

सहशिक्षक

ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, माशाळ वस्ती, सोलापूर

Post a Comment

0 Comments