महूद गावातून जाणाऱ्या जडवाहतुकीचा प्रश्न झाला गंभीर प्रशासन बेफिकीर म्हणून आता होणार आंदोलन..पत्रकार पवन बाजारे
संबंधित प्रशासन विभागाला पत्रव्यवहार व वारंवार सांगून सुद्धा दखल घेतली जात नाही. महूद- महूद (ता.सांगोला) या गावातून जाणाऱ्या
जडवाहतुकीचा प्रश्नावरती गेली दोन महिने सांगोला पोलीस स्टेशन, उपप्रादेशिक परिवहन विभाग अकलूज,
तसेच तहसीलदार सांगोला या प्रशासन विभागांना पत्रव्यवहार करून नुसती चर्चा चालू आहे परंतु कोणतीही ठोस कार्यवाही या विभागाकडून जडवाहतुकी संदर्भात केली जात नाही.
या जडवाहतुकीमुळे महूद नागरिक व प्रवासी नागरिक जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये जा करत आहेत. वारंवार वाहतूक कोंडी होत आहे
तसेच या जडवाहतुकीमुळे सर्व दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांच्या धंद्यावरती परिणाम होऊ लागला आहे अनेक लोकांचे विनाकारण जीव गेलेले आहेत अगदी लोकांच्या जीवावर उठलेली ही जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करावी
अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे. सांगोल्यावरून महूदकडे येणारी जडवाहतूक प्रामुख्याने पूर्वी पंढरपूर मार्गे टेंभुर्णीला जात होती ती अनेक वर्ष महूद गावाकडे वळवलेली असून गावावर लादलेली आहे
ती बंद करण्याची महूद गावच्या ग्रामस्थांची प्रामुख्याने मागणी आहे तसेच पंढरपूर-मल्हारपेठ यामार्गावरून येणारी तसेच इंदापूर,आटपाडी, कराड या मार्गे येणारी ही सर्व जडवाहतूक वाढू लागली आहे आणि ही सर्व
वाहतूक दिवस रात्र भरधाव वेगाने चालू असते त्यामुळे नागरिक हैराण झालेली आहेत ती बंद करण्यासंदर्भात गेली कित्येक दिवस या प्रशासन विभागांना मी स्वतः ग्रामपंचायत ठराव घेऊन पत्रव्यवहार केलेला
आहेच तसेच वारंवार सांगून सुद्धा यावरती कोणतीही गंभीर्याने कार्यवाही या विभागाकडून झालेली नाही. तहसीलदार संतोष कणसे साहेब यांनी स्वतः मेन चौक महूद या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले व त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना
महूद ग्रामपंचायत ठरवासहित पत्रव्यवहार करून वास्तव परिस्थिती कळवलेली आहे नंतर काही दिवसांनी जिल्हाधिकारी सोलापूर ऑफिस यांच्याकडून पोलीस अधीक्षक सोलापूर व उपप्रादेशिक परिवहन विभाग
अकलूज, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पंढरपूर या तीन विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला तरीही या प्रशासन विभागांनी जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सुद्धा उत्तर दिलेले नाही
केराची टोपली दाखवलेली आहे या मस्तावलेल्या प्रशासन विभागाला सर्व महूद ग्रामस्थ यांच्यावतीने दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यासंदर्भात मुदत देत आहे नाहीतर,
यांना धडा शिकवण्यासाठी मी पत्रकार पवन बाजारे व समस्त महूद ग्रामस्थ यांच्या पाठिंब्यावरती लोकशाही मार्गाने दिनांक 20 फेब्रुवारी पासून मेन चौक महूद या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देत आहे.


0 Comments