धक्कादायक; संचालकाकडून अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार
पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नौशाद आणि त्याला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला बाल संरक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशाद अहमद शेख हे पिंपरी चिंचवड येथील रावेत कॉर्नर येथे क्रिएटिव्ह अकॅडमी नावाने निवासी शाळा चालवतात.
पीडितेच्या वडिलांनी 2021 मध्ये तिला क्रिएटिव्ह अकादमी निवासी शाळेत नववीत वर्गात दाखल केले आणि मुलीच्या शिक्षणासाठी 2 लाख 26 हजार रुपये फी भरली.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या की, आरोपी संचालक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देतो आणि सेमिनारच्या माध्यमातून मुला-मुलींना इयत्ता आठवी ते
बारावीच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. 2021 मध्ये त्याने यवतमाळला जाऊन असाच एक सेमिनार घेतला होता.
सध्या या शाळेत इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत सुमारे 75 मुली आणि 100 हून अधिक मुले शिकत आहेत. येथे शिकणाऱ्या मुलांना मोबाईल फोन वापरण्यास आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मनाई आहे.
येथे नियम असा आहे की, पालक आपल्या मुलास महिन्यातून एकदा प्रत्यक्ष भेटू शकतात. त्यामुळे येथे काय चालले आहे, याची माहिती मुलांना वेळेत पालकांना देता येत नाही.
आरोपी संचालक शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर राहतो. पीडिता 14 वर्षांची असताना त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
दरम्यान, पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेखने मुलीला तिचे अश्लील फोटो दाखवून तसेच तिचे इतर मुलांशी अनैतिक संबंध असल्याचे सांगून शिवीगाळ केली.
सुरुवातीला 2022 मध्ये त्याने मुलीला तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेने विरोध केला आणि तेथून निघून गेली. मात्र त्यानंतर
आरोपीने पीडित मुलीला जाणूनबुजून त्रास देण्यास सुरुवात केली आणि तिच्या घरच्यांना फोन करून तुझे शाळेतील मुलांशी संबंध असल्याचे सांगेन, अशी धमकी दिली.
पीडित तरुणी दिवाळीच्या सुट्टीत घरी जाणार होती, त्यावेळीही त्याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडितेने शाळेत जाण्यास नकार दिला
त्यानंतर तिच्या पालकांनी तिला कारण विचारलं आणि पीडितेने 11 जानेवारीला तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर मात्र कुटुंबाला धक्काच बसला.
पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि स्वप्ना गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
30 ऑक्टोबर 2014 रोजी अकादमीच्या एका विद्यार्थिनीने देहू रोड पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार दाखल केली होती.
काही दिवसांनी याच संस्थेत शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींनीही अशा घटना घडत असल्याचे पोलिसांना सांगितले.
या घटनेच्या विरोधात शहरातील विविध महिला व सामाजिक संघटनांनी मोर्चा काढून संचालकाच्या अटकेची मागणी केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला.
दरम्यान, त्याने त्यावेळी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर पुणे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
या प्रकरणात पीडित विद्यार्थीनींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन,
या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा सऱ्हाईत गुन्हेगार असून, अकॅडमीच्या विद्यार्थ्याने 2014 मध्ये शेखविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.
त्यावेळी शेख फरार झाला होता आणि नंतर शहरात परतला होता. पोलिसांनी शेखला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
0 Comments