निवडणूक आयोगाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून संकेत काळे यांची निवड
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी चालू आहे. यामध्ये १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक, युवती व नागरिकांची मतदार नोंदणी चालू आहे.
सदर मोहिमे दरम्यान १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक, युवती यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष मतदारनोंदणी अभियानाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून संकेत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संकेत काळे यांना नुकतेच निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले आहे. संकेत काळे यांनी नुकतेच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट
फिजिक मेन चॅम्पियनशिप २०२२-२३ या स्पर्धेत रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून उज्वल यश संपादन केले आहे . याआधी सलग दोन वर्षे संकेत याने राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकले आहे.
संकेत काळे यांनी सांगोला तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे. याचीच दखल घेत निवडणूक आयोगाकडून संकेत काळे यांची सांगोला विधानसभा मतदार संघाच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी निवड केली आहे.
मतदारनोंदणी अभियानाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून संकेत हे तरुण मतदारांना मतदारनोंदणी करण्यासाठी जनजागृती करतील.


0 Comments