डॉ. अनिकेत देशमुख यांना मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांना वर्ल्ड हेल्थ वेलनेस काँग्रेस या जागतिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा बेस्ट इन्कलास फॉर ऑर्थोपेडिक केअर हा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी मलेशियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ कोहकर चई यांच्या हस्ते उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला.
सामाजिक कार्य तसेच वैद्यकीय क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २०२४ चा दिला जाणारा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार
डॉ. अनिकेत देशमुख यांना मिळालेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ.अनिकेत देशमुख हे सध्या वैद्यकीय सेवेबरोबरच स्व. भाई. गणपतराव देशमुख यांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवित आहेत.
सदरचा पुरस्कार हा माझा नसून स्व.आबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे. पुरस्कारामुळे अधिक चांगली रुग्णसेवा, समाजसेवा देण्यासाठी ऊर्जा मिळाली - डॉ. अनिकेत देशमुख


0 Comments