google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर तालुक्यातील घटना ...पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून ३० वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

Breaking News

पंढरपूर तालुक्यातील घटना ...पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून ३० वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

 पंढरपूर तालुक्यातील घटना ...पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि


अपमानाला कंटाळून ३० वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या 

पंढरपूर :- आई आणि मुलावर झाले एकत्र अंत्यसंस्कार; जाचाला कंटाळून सहा वर्षाच्या मुलासह आईची आत्महत्या 

पती आणि सासू सासरे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून ३० वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे घडली.

या घटनेतील मृत आई आणि मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, देवडे येथील प्रियांका विक्रम नलवडे (वय ३०) यांनी पती, सासू सासरे 

यांच्याकडून होणाऱ्या जाच, अपमानास्पद वागणुकीमुळे कंटाळून सोमवारी (दि. १) रात्री आपल्या ६ वर्षीय राजवीर या मुलासह भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती.

याबाबत मृत प्रियांका यांचा भाऊ विशाल किशोर डुकरे (रा. नळदुर्ग) यांनी मंगळवारी (दि. २) सायंकाळी करकंब पोलीस ठाण्यात पती विक्रम नलवडे, सासरा इंद्रजित नलवडे आणि सासू संगीता नलवडे यांच्याविरुद्ध

आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 मंगळवारी रात्री देवडे येथील स्मशानभूमीत मृत प्रियांका आणि राजवीर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

करकंब पोलिसांनी पती विक्रम नलवडे, सासरा इंद्रजित नलवडे यांना अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गायकवाड अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments