मोठी बातमी.. पुण्यात शरद मोहोळ हत्येप्रकरणीआठआरोपी जेरबंद, आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश,
गुन्ह्यातील पिस्टल, काडतुसांसह दोन कार हस्तगत,पुणे पोलिसांची कामगिरी!!
पुणे - पुणे शहरातील सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याची सुतारदरा कोथरूड परिसरात त्याच्याच साथीदारांनी शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून निर्घुण हत्या केली.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुन्या वादातून साथीदारांकडून झालेल्या सराईत गुन्हेगार मोहोळ याच्या हत्येमुळे शहरातील वातावरण तापले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची नऊ पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी अवघ्या आठ तासात मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर यांच्यासह एकूण आठ साथीदारांना जेरबंद केले. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली तीन गावठी पिस्टल,तीन
मॅक्झिन,पाच जिवंत काडतुसे व आठ मोबाईल सेट असा मुद्देमाल आरोपीं कडून हस्तगत करण्यात आलेला आहे. या गंभीर हत्येप्रकरणी साहिल उर्फ मुन्ना संतोष कोळेकर (वय 20,रा. सुतारदरा कोथरूड),
नामदेव महिपती कानगुडे (वय 35, रा. भुगाव, मुळशी )अमित उर्फ अमर मारुती कानगुडे(वय 24 रा. पर्वती पुणे),चंद्रकांत शाहू शेळके (वय 22,रा. जनतावसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर ( वय 20, रा. पौड मुळशी पुणे),
विठ्ठल किसन गांजले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरूड) यांच्यासह ऍड. रवींद्र वसंतराव पवार (वय 40, रा. नांदगाव मुळशी),ऍड. संजय रामभाऊ उडान (वय 43,रा. भुसारी कॉलनी कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ हत्येची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची नऊ विशेष पथके
पुणे शहर,मुळशी,सातारा,पुणे ग्रामीण व कोल्हापूर या दिशेने रवाना करण्यात आली होती. दरम्यान खंडणी विरोधी पथक 2 चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,
हत्येचा गंभीर गुन्हा करून आरोपी चार चाकी वाहनातून पळून गेलेले आहेत. तांत्रिक विश्लेषणातून हे आरोपी साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे असणाऱ्या चार चाकी वाहनांचा नंबरचा शोध घेऊन
आरोपी हे खेड शिवापुर टोल नाका पास करून पुढे जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान सातारा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून सातारा मार्गावर शिरवळ,आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई या परिसरात नाकाबंदी लावण्यात आलेली होती.
त्यानुसार सातारा रोडवर किकवी जवळ गुन्ह्यातील निष्पन्न झालेली संशयित स्वीफ्ट कार क्रमांक (MH-12 VQ-9500) हीच पाच किलोमीटर अंतरावर पाठलाग करून आरोपींना शिताफिने ताब्यात घेण्यात आले.
तसेच महिंद्रा एक्स यु व्ही क्रमांक (MH-12 UF-8282) या दोन वाहनांना ताब्यात घेण्यात आले.पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे,
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे,शब्बीर सय्यद,श्रीहरी बहिरट,महेश बोळकोटगी,सोमनाथ जाधव,
उल्हास कदम,सुनील थोपटे,क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील,पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव,श्रीकांत चव्हाण,राहुल पवार,राजेंद्र पाटोळे तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी ही कामगिरी केली.
0 Comments