google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सुप्रिया दिघे व प्रा.डॉ. नागनाथ घोरपडे प्रथम

Breaking News

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सुप्रिया दिघे व प्रा.डॉ. नागनाथ घोरपडे प्रथम

 डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सुप्रिया दिघे व प्रा.डॉ. नागनाथ घोरपडे प्रथम


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी 

सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे निकाल जाहिर करण्यात आले.

सदर स्पर्धेत ८ वी ते १२ वी गटात सुप्रिया भानुदास दिघे हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच वैष्णवी सदानंद हालदांडे हिने द्वितीय, स्वप्नील राजेंद्र शिंदे याने तृतीय आणि दिशांत किशोर चीलवकर व लतिका राजेंद्र इंगोले हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

 खुल्या गटात प्रा.डॉ.नागनाथ दत्तात्रय घोरपडे यांनी प्रथम, विशाल भागवत सरतापे यांनी द्वितीय, जयश्री यशवंत पाटील यांनी 

तृतीय, आबासाहेब तुकाराम हाके व प्रगती पंडित भोसले यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धेत 200 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांकासाठी तानाजी मुरलीधर कोळेकर यांनी प्रत्येकी 3000 रू, द्वितीय क्रमांकासाठी श्रीनिवास येलपले सर

 यांनी प्रत्येकी 2000 रू, तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी 1000 रू आणि उत्तेजनार्थ क्रमांकासाठी संजय वलेकर सर यांच्याकडून प्रत्येकी 500 रू बक्षिस देण्यात येणार आहे.

 तसेच मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच लवकरच स्पर्धेतील निबंधाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याची  माहिती ॲड. सोमनाथ काळे व ॲड.तुकाराम ढेरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments