google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार... कुर्डुवाडीत पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्यातच आयुष्य संपविले

Breaking News

धक्कादायक प्रकार... कुर्डुवाडीत पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्यातच आयुष्य संपविले

 धक्कादायक प्रकार... कुर्डुवाडीत पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्यातच आयुष्य संपविले


लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डूवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच कर्तव्यावर असताना 

स्वतच्या कार्यालयातीलच छताच्या लाकडी वाश्याला एका दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दु ४ वा.दरम्यान घडली.

विश्वनाथ चिमाजी जगाडे (वय -३९,मूळ रा परभणी जिल्हा परभणी, सध्या कुर्डूवाडी ता.माढा)असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डूवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

 घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खासगी पशुवैद्य येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. गुरूवारी सकाळी 

सोलापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

0 Comments