सांगोला शहर व तालुक्यात न भूतो न भविष्यति असा सामाजिक बांधिलकीचा भरगच्च कार्यक्रम
उद्या साजरा होणार दिपकआबांचा ऐतिहासिक अभिष्टचिंतन सोहळा
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
सांगोला (प्रतिनिधी):-राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष, लोकनेते, कार्यसम्राट पाणीदार माजी आमदार दिपकआचा साळुंखे-पाटील यांच्या बाढदिवसाचे
औचित्य साधून सांगोला शहर आणि तालुक्यात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सांगोला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात हा सर्वांत भव्यदिव्य आणि ऐतिहासिक अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे.
रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० चा महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते तसेच आमदार निलेशजी लंके आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
सांगोला विद्यामंदिर प्रश्नाला आणि ज्युनिअर कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराब काळे,
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुरेश आबा पालवे, फैबटेक उद्योग समूहाचे अध्यक्ष भाऊसाहेब स्पनर, ज्वेश नेते बाबुराव गायकवाड,
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लबटे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते आदीसह शहर
आणि तालुक्यातील मान्यवर उपस्थितराहणार आहेत.
या मेळाव्यातून सांगोला सालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमात माजी आमदार दिपकआबांच्या वतीने पायपीट करून
शिक्षणाचे धडे गिरवत असलेल्या गरीब आणि गरजू शालेय विद्यार्थिनीना मोफत सायकल वाटप आणि निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभा
करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. बाढदिवसाचे औचित्य रविवार ७ रोजी सांगोला शहर आणि तालुक्यात हजारो महिलांना फिट आणि साड़ी बाटप करण्यात येईल
तसेच बहुतांशी सर्व गावांत हजारो लोकांना महाअवदान करण्यात येईल. त्याचधरोबर सांगोला शहरात दिपक आचांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सुरू
असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा बरार आणि भव्यदिव्य बक्षीस वितरण समारंभ रविवार रात्री ९ वा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस तब्बल ३ लाख
६०१ इतके आहे. सांगोला शहरासह ग्रामीण भागातही हंगिरंगे ता सांगोला येथे भब्य रक्तदान शिविर आयोजित केले आहे.
मांजरी ता सांगोला येथेही दिपक आबांच्या बाह दिवसानिमित्त मांजरी आणि पंचक्रोशितील जनतेला मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
त्याचचरोबर सांगोला शहरात सायं ४ वा. डॉ. अक्षय कांबळे यांनी मिरज रोड येथे भव्य मोफत आरोग्यतपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरातून सांगोला शहरातील हजारो लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. कडलास ता सांगोला येथे रविवार ७ जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होईल
ही स्पर्धा ७ ते ९ जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड करण्यात येईल त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
माजी आमदार दिपकआबांच्या वाढदिवसानिमित्त अकोला येथे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या तसेच मंगळवार ९ जानेवारी रोजी आबांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यस्तरीय शूटिंग हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. माजी आमदार दिपकआबांचे मूळ गाव असलेल्या जवळा येथेही ६ जानेवारी रोजी स १० ला नारायण मंदिर जवळा
येथे महिलांसाठी शेकडो बक्षिसांची मेजवानीसह होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीप्पेहळी ता सांगोला येथेही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
गावोगावी सुमारे २० हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर २५ ते ३० हजार महिलांना साडी तसेच ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे.
सांगोला तालुक्यातील तब्बल ५० ते ६० हजार नागरिकांना गावोगावी अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रथमच सांगोला तालुक्याच्या इतिहासात सर्वात भव्यदिव्य असा बाढदिवस साजरा होत आहे.
0 Comments