google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कामावरून काढण्याच्या नोटिसा; मिळाली 'इतक्या' दिवसाची डेडलाईन

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कामावरून काढण्याच्या नोटिसा; मिळाली 'इतक्या' दिवसाची डेडलाईन

 ब्रेकिंग न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कामावरून


काढण्याच्या नोटिसा; मिळाली 'इतक्या' दिवसाची डेडलाईन 

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन महिन्यानंतरही सुरूच आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार अंगणवाड्यांच्या चाव्याच मिळालेल्या नाहीत.

 त्यामुळे स्तनदा मातांसह गर्भवती महिला व चिमुकल्यांच्या आहाराचा प्रश्न गंभीर बनला आहे

या पार्श्वभूमीवर आता संपातील सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत कामावर हजर व्हा, 

अन्यथा कामावरून कमी करण्याचा लेखी इशारा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात चार हजार ७६ अंगणवाड्या असून त्याअंतर्गत एकूण सात हजार मदतनीस व सेविका कार्यरत आहेत. अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या

 चिमुकल्यांची संख्या एक लाखांवर असून ६ महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या एक लाख सहा हजारांवर आहे. दुसरीकडे स्तनदा माता व गरोदर महिलांची संख्याही ३७ हजारांपर्यंत आहे.

दुष्काळी परिस्थितीत या सर्वसामान्य कुटुंबातील गर्भवती महिलांसह स्तनदा माता व ३ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना दरमहा वेळेवर पोषण आहार पोच व्हावा असे अपेक्षित आहे.

मात्र, जानेवारीचा आहार अजूनही या लाभार्थींना मिळालेला नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना तब्बल एक महिन्यापासून पोषण आहार ना अध्यापन अशी वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर आता कठोर पाऊल उचलून बहुतेक मदतनीस व सेविकांना कामावरून कमी का करू नये, अशी नोटीस बजावली जात आहे.

नोटिशीनंतर दोन दिवसांत हजर व्हावा, अन्यथा…

संप सुरू झाल्यानंतर एकदा लेखी नोटीस दिली, वारंवार तोंडी सांगण्यात आले. तरीपण, केवळ २८९ मदतनीस- सेविकाच कामावर हजर झाल्या आहेत. 

अजूनही सात हजार मदतनीस- सेविका कामावर नाहीत. त्याचा थेट परिणाम चिमुकल्यांसह गर्भवती महिला व स्तनदा मातांवर झाला आहे.

त्यामुळे आता नोटीस बजावल्यानंतर दोन दिवसांत कामावर हजर न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी केले जाणार आहे. त्याठिकाणी प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवारांची निवड करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांतर्फे शिक्षण

सोलापूर जिल्ह्यात चार हजार ७६ अंगणवाड्या असून त्यापैकी एक हजार ५३ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सध्या पोषण आहार दिला जातोय.

 अवघ्या २८९ अंगणवाड्या उघडल्या असून जवळपास ६५० अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गावरील शिक्षकांमार्फत दररोज एक तास शिकवले जात

 असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. अजूनही साडेतीन हजार अंगणवाड्यांना कुलूप आहे.

Post a Comment

0 Comments