सोलापूर दुर्देवी घटना..वाढदिवस असतानाच क्रूर नियतीने डाव साधला
बाईक झाडावर धडकून भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू
सोलापूर शहरातील महावीर चौकात काल रात्री बाईक झाडावर धडकून भीषण अपघात झाला.
या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने मुलांच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
जुळे सोलापूर भागात राहणारे इरण्णा मठपती, निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी हे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या
सुमारास आपल्या पल्सर बाईकवरुन घरी जात होते. दरम्यान शहरातील महावीर चौकात त्यांची बाईक झाडावर आदळली.
ही धडक इतकी भीषण होती की तिघेही तरुण गाडीवरुन उडून पडले. या अपघातात तरुणांच्या डोक्याला जबर जखम लागल्याने ते जागेवरच ठार झाले.
दुर्देवी बाब म्हणजे यामधील इरण्णा या तरुणाचा वाढदिवसही होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मृत तरुणांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत असून घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments