google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांने लिहलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Breaking News

डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांने लिहलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल

 डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांने


लिहलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) : शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला येथील कार्यकर्त्यांने लिहलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस येत्या आठवड्यात (३ जानेवारी) रोजी आहे. त्यानिमित्ताने व्हायरल झालेले पत्र पुढीलप्रमाणे

बाबासाहेब, व्हेरी व्हेरी हॅपी बड्डे....अन सॉरीसुद्धा…--

नेमका वार आठवत नाही, पण तो दिवस अन ती वेळ मात्र पक्की आठवते. सांगोल्यातील एका रुग्णालयात आईला ॲडमिट केलं होतं.रात्र पुरती उतरणीला लागलेली.

 त्यातच  बाहेर विजांसह मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यावरुन एखादं दुसरं वाहन ये-जा करत होतं.  निसर्गाने मांडलेले थैमान मात्र मला बिलकूल ऐकू येत नव्हते. 'उद्या सकाळी तुमच्या आईचे ऑपरेशन आहे,

 पैसे भरल्यानंतर ऑपरेशनला घेऊ' असे रिसेप्शन टेबलवरून दुपारीच सांगण्यात आल्याने विज चमकावी तसे माझे पूर्ण शरीर चमकून गेले. पोटात गोळा आला. येताना आईचे ऑपरेशन करावे लागेल 

याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हातउसणे करून अडीच-तीन हजारांची जुळणी करत रुग्णालय गाठलं होतं. पण पुढ्यात ऑपरेशन वाढून ठेवल्याने हातपाय गळाले. 

पण, शेवटी आईच ती. तिच्यासाठी कुणाकडेही हातपाय पसरू पण पैसे उभा करू हा धीर मनालाच देत मी रुग्णालयाच्या गॅलरीत उभा राहून नातेवाईक, मित्र, भावकीतील भावबंधांना पैशासाठी फोन करत होतो.

वेगवेगळ्या ठिकाणी दहा-पंधरा कॉल केल्यानंतरही मदतीचा एकही हो शब्द कानावर आला नाही. अनेकांनी असंख्य कारणे सांगितली. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मी नाही त्या व्यक्तींकडे पैशासाठी मदतीची याचना केली. 

पण, कुणीच धावले नाही. पैसे नसतील तर आईच्या ऑपरेशनचे काय? या प्रश्नाने भंडावून तर सोडलेच पण एका क्षणी डोळ्यातूनही घळाघळा अश्रू वाहिले.

  शेवटी अत्यंत धीटाईने माझ्याच मोबाईलमध्ये असणारा एक नंबर डायल  करायचे ठरविले. पण, धाडस होईना. गतविधानसभेला याच व्यक्तीच्या पक्षाविरोधात मी काम केले होते.

 आपल्याच जातीच्या माणसाला मतदान करण्याच्या भूलथापेला मीही बळी पडलो होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला मदत कशी मागायची या प्रश्नाने मीच क्षणभर पश्चाताप करून गेलो. समोरचा व्यक्ती आपणाला ओळखत नाही,

 त्याचा आपला कधी परिचय नाही. पण माणुसकीसाठी तो सदैव तत्पर असतो हे अनेकांकडून ऐकले होते. त्याच ऐकीव माहितीवर त्या व्यक्तीला फोन केला.

तीन-चार रिंग झाल्यानंतर फोन उचलला गेला. मात्र, त्या क्षणी माझा आवाज कातर झाला. मला बोलयाचे सुचेना, पण, त्यातूनही अश्रू आवरत मी माझी आपबित्ती एका दमात कथन केली.

 माझी अडचण पूर्ण ऐकून घेतल्यानंतर  त्या व्यक्तीने सध्या कुठे आहात, कोणते रुग्णालय, किती पैशांची गरज आहे याची माहिती घेतली. मीही ती पटकन सांगून टाकली. 'ओके, काळजी करू नका, 

मी तुमच्यासोबत आहे' इतके सांगत समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. एका क्षणी वाटले यांनी तर पुढाऱ्यासारखेच आश्वासन दिले. पैशावर तर हे काहीच बोलले नाहीत.  आपण त्यांना पुन्हा फोन करावा का?

 या साऱ्या विचारचक्रात मी गुंग झालो. यात पंधरा मिनिटांचा वेळ गेला असेल तितक्यात रुग्णालयाच्या दारात एक गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या एक सडपातळ बांध्याच्या व्यक्तीकडे पाहून मी हरखून गेलो. 

मी जवळ गेलो, मीच फोन केला होता असे सांगताच माझ्या खांद्यावर हात ठेवत घाबरू नका, सगळं व्यवस्थिती होईल असं म्हणत त्या व्यक्तीने खिशातील पैसे काढत ती रक्कम माझ्या हातात ठेवली.

रक्कमेचा बंडल पाहून अहो, एवढे पैसे ऑपरेशनला लागणार नाहीत, इतके कशाला देताय? 

म्हणत त्यातील काही पैसे त्यांना परत करण्यासाठी मी पुढे सरसावलो. पण, मध्येच मला अडवत त्यांनी ते पैसे मला परत खिशात ठेवायला लावले.

 हे पैसे मी दिलेत हे तू कुणालाच बोलणार नाही ही अट ठेवत  माझ्या एका फोनवर भरपावसात निम्म्यारात्री मला पैसे देण्यासाठी आलेला तो व्यक्ती तितक्याच गतीने परतही गेला.

 त्या व्यक्तीच्या दातृत्वामुळे दुसऱ्या दिवशी आईचे ऑपरेशन यशस्वीपणे करता आले. आई शुद्दीवर आल्यानंतर तिने पैसे कुणाकडून घेतले, कुणी मदत केली म्हणून कैकदा विचारले. 

पण, त्या दातृत्वाची अट मला मोडता येत नव्हती. त्यामुळे दिले मित्राने म्हणून मी वेळ मारुन न्यायचे. आईच्या ऑपरेशननंतर मला महिनाभर सांगोल्याला जाता आलं नाही.

पण, त्या देवदूताचे उपकार कसे मानायचे हा प्रश्न माझ्या मनातून जात नव्हता. एकेदिवशी बंगल्यावर जाऊन त्यांना भेटू असा निश्चय मी केला. पण, तो माझ्या मनातच राहिला. असेच एकेदिवशी 

सांगोल्याचा बाजार करून आईसोबत मी सांगोला-पंढरपूर रस्त्यावरुन गावाकडे निघालो होतो. डोक्याला उन्हाच्या झळा बसत असल्याने एका रसवंतीगृहावर दुचाकी थांबवली. 

तितक्यात एक कार आमच्या पुढ्यात येऊन थांबली. मी गाडीही ओळखली अन गाडीतला व्यक्तीही. त्यांनीही मला पटकन ओळखत खांद्यावर हात टाकला. माझा रस घेण्याचा आग्रह त्यांना मोडवेता येईना. 

मी आईला त्यांच्याबद्दल काही सांगणार तोच त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत कधीकाळी ठेवलेल्या अटीची आठवण करून दिली.

मला काहीच बोलता येईना. आईच्या तब्येतीची विचारपूस केली, शेतात काय काय आहे याची माहिती घेतली. 

ग्लासमधील रस संपल्यानंतर पटकन उठत त्यांनीच बिलही भागविले. 'येतो, पुन्हा भेटूया, काही मदत लागली तर सांगा' म्हणत ती व्यक्ती पाठमोरीही झाली.

आई माझ्याकडे अन मी त्या व्यक्तीकडे एकटक पाहत होतो. डोळ्यांच्या कडा पूर्ण अश्रूंनी न्हाऊन निघाल्या होत्या. 

माझे पानावलेले डोळे पाहून आपलं रुग्णालयात बिल कुणी भरलं याचा पुरता उलगडा एव्हाना आईलाही झाला होता. पण, त्यांनी उपकराची परतफेड करण्याची संधी दिलीच कुठं...तिथून पुढे

 सांगोल्याला माझ्या अनेक फेऱ्या झाल्या, जातायेता त्या व्यक्तीसोबत अनेकदा भेटी झाल्या, मला खात्री आहे की त्या व्यक्तीने त्या मदतीचे उपकार कधी डोक्यातही ठेवले नसणार, तो माणूसच त्यापलीकडचा आहे

. पण, मी मात्र, कृतघ्नपणे जातीचा अभिमान बाळगत निर्माण केलेली दरी ओलांडून त्यांच्यापर्यंत जाण्याचं धारिष्ट्य कधी करू शकलो नाही. व्हेरी सॉरी बाबासाहेब, व्हेरी सॉरी....तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Post a Comment

0 Comments