धक्कादायक प्रकार.. कोळे ता. सांगोला या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्यात दोघेजण गंभीररीत्या जखमी..
कोळे विशेष प्रतिनिधी :-
कोळे येथील संत तुकाराम नगर येथे सकाळीं सुमारे 7.30 वां. सुमारास वन्य प्राण्यांच्या हल्यात नवनाथ विष्णू कोळेकर वय वर्ष 13 व महादेव पांडुरंग आलदर वय वर्ष 55 ह्यांच्यावर
कोल्हा सदृश्य प्राणाने हल्ला करून गंभीरित्या जखमी केलेले आहे. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सदर या वस्तीवरील सर्वच लोक भयभीत झालेले असून सदर अशा वन्य प्राण्यांचे हल्ले न होण्यासाठी वनरक्षक अधिकारी यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
0 Comments