मोठी बातमी...सांगोला शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढविणार- मा सागर लवटे.
सांगोला शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणी मर्यादित सांगोला संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन 2023 24 28 29 संदर्भात सदानंद हॉटेल येथे पार पडली.
संस्था स्थापनेच्या वेळी 26270 हजार सभासद होते सर्वसामान्य महिलांनी पदरमोड करून शेअर्स खरेदी केले होते आज पर्यंत सर्व निवडणुकांमध्ये सभासद पात्र होते.
मात्र संचालक मंडळांनी सभासदांना विश्वासात न घेता किंवा 22/1 नुसार कोणतीही नोटीस न देता किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सुमारे 23 हजार 920 सभासद अपात्र करून सूतगिरणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
हा एक प्रकारे सर्वसामान्य सभासदावर अन्याय आहे म्हणून त्यामध्ये अपात्र मतदारांचा मुद्दा आहे. तो मार्गी लावून झालेला अन्याय दूर करण्यासाठी निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचे ठरविले आहे.
तसेच पात्र अपात्र सदस्यांच्या याद्या गावोगावी डिजिटल करून लावणे घरोघरी जाऊन सभासदांना भेटणे असे नियोजन नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ठरले आहे.
तसेच आजी-माजी संचालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा घेणे ठरले आहे. यावेळी सूतगिरणीचे संचालक सागर लवटे चंद्रकांत आप्पा खरात अभिजीत नलवडे शिवाजीराव शिंदे गणेश कदम गुलाब होवाळ समीर पाटील धनाजी माने
दीपक दिघे बाळासो अनुसे बजरंग बारसे सत्यवान देशमुख कुंडलिक सातपुते रियाज तांबोळी बनसोडे तानाजी भोसले दादासो लवटे प्रसाद लवटे राजू हजारे महेंद्र बाजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments