google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Breaking News

सांगोला तालुक्यातील कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

 सांगोला तालुक्यातील कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कर्तव्यावर असताना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबावणी न करणे, घरकुल बांधणीमध्ये असमाधानकारक कामगिरी,

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर व अंतर्गत रस्ते कामांचे प्रस्ताव व आराखडे सादर न करणे, जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी मंजूर कामाचे कार्यरंभ आदेश न देणे, 

ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यासमवेतचे वर्तन व्यवस्थित नसणे अशा तक्रारी प्राप्त झाल्याने वाकी शिवणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. एम. इंगोले यांना निलंबित केले 

असल्याची माहिती गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली. वाकी शिवणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. एम. इंगोले यांना गटविकासअधिकारी आनंद लोकरे यांनी वारंवार सुचना देऊनही केंद्र सरकारचे 

महत्वाकांक्षी उपक्रम ग्रामीण घरकुल बांधणीमध्ये अतिशय असमाधानकारक कामगिरी करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर व अंतर्गत रस्ते इत्यादी कामांचे प्रस्ताव

 व आराखडे सादर न करणे, जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी या मंजूर कामाचे कार्यरंभ आदेश न देणे, ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यासमवेतचे वर्तन व्यवस्थित ठेवले नाही.

 गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी मासिक व नियमित आढावा सभेमध्ये वारंवार तोंडी व लेखी तोंडी सूचना देऊन देखील ग्रामविकास अधिकारी एस. एम. इंगोले यांच्यात सुधारणा झाली नसल्याने इंगोले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments