सोलापूर जिल्ह्यातील 'थर्टी फर्स्ट' च्या रात्री हुल्लडबाजी केल्यास खैर नाही पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे
सोलापूर (प्रतिनिधी) कॅलेंडर वर्षाचा शेवटचा दिवस अर्थातच डिसेंबर, थर्टी फर्स्ट...! ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वा.नंतर सन २०२४ हे नवीन वर्षास सुरूवात होणार आहे. त्यानिमित्त रात्रीचे वेळी लोक विशेषतः
तरुण-तरूणी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करतात. अशावेळी शहरात अपघात अथवा कोणताही अनुचित प्रकार घडून सार्वजनिक शांततेला गालबोट लागू नये,
यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.त्यात ३ पोलीस उप आयुक्त,६ सहाय्यक पोलिस आयुक्त,२२ पोलीस निरीक्षक, ४६ सपोनि/पोसई आणि ७३५ पोलिस
अंमलदार असा एकूण ८१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
नववर्षाचे स्वागत करण्याच्या उत्साहात तरूण मुले-मुली रस्त्यावर रात्रीच्या वेळी पायी,मोटार वाहनावर फिरतात.नव वर्षे स्वागत करणारे अति उत्साही लोकांमुळे व वेगाने वाहन चालविणारे लोकांकडून अपघात होऊ शकतात,
तसेच दारू पिऊन गाडी चालवू नये, ट्रीपल सिट घेऊन आरडाओरडा करत मोटार सायकल चालवू नये, ध्वनी प्रदुषण होईल,असे कृत्य कोणी करू नये,
मोटार सायकलचे सायलेन्सर काढून गाडी कोणीही चालवू नये,महिलांची छेडछाड करणारे कृत्य कोणी करू नये,बिभत्स वर्तन कोणी करणार नाही,असे करताना आढळून आल्यास पोलीस प्रशासन संबधितावर योग्य ती कारवाई करेल,
असंही पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे यांनी म्हटलं आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोलापूर शहरात ७० स्टॅटिक पॉईट,१३ ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेट लावण्यात आली आहे.
सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क), सात रस्ता,नई जिंदगी,या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमण्यात आले आहेत.
0 Comments