google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर झेडपी सीईओंनी काढला तोडगा, स्तनदा, गरोदर मातांसह चिमुकल्यांच्या आहाराची मिटणार चिंता ग्रामसेवकांच्या हाती अंगणवाड्यांची चावी

Breaking News

सोलापूर झेडपी सीईओंनी काढला तोडगा, स्तनदा, गरोदर मातांसह चिमुकल्यांच्या आहाराची मिटणार चिंता ग्रामसेवकांच्या हाती अंगणवाड्यांची चावी

 सोलापूर झेडपी सीईओंनी काढला तोडगा, स्तनदा, गरोदर मातांसह चिमुकल्यांच्या


आहाराची मिटणार चिंता ग्रामसेवकांच्या हाती अंगणवाड्यांची चावी 

सोलापूर, ता. २९: गावचे सरपंच, अंगणवाडी ज्या प्रभागात आहे तेथील महिला सदस्या, ग्रामसेवक, अंगणवाडीची मुख्यसेविका 

या समितीच्या मदतीने २५ दिवसांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या आता उघडणार आहेत. अंगणवाड्यांच्या चावी ग्रामसेवकांकडे असणार आहेत. 

या समितीच्या मदतीने अंगणवाड्या सुरू करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे. 

अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे निर्माण झालेली अडचण या निर्णयामुळे दूर होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या एक लाखांवर असून, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची मुले जिल्ह्यात एक लाख सात हजार आहेत.

 स्तनदा माता व गरोदर महिलांची संख्या ३७ हजारांपर्यंत आहे. या सर्वांना एकात्मिक बालविकास विभागातर्फे नियमितपोषण आहार दिला जातो. 

पण, सध्या अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचारी मागील २५ दिवसांपासून बेमुदत बा कामबंद आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी (ता. २९) त्यांनी साखळी आंदोलन केले. 

दरम्यान, स्तनदा माता, गरोदर महिला न व सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना डिसेंबरपर्यंत आहार घरपोच केला आहे. पण, आता जानेवारी- फेब्रुवारीचा ■ आहार आला असतानाही कर्मचारी नसल्याने वाटप झालेला - नाही.

 या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गटविकास अधिकारी, प्राथमिक शिक्षणकडील विस्ताराधिकारी, केंद्राप्रमुखांची बैठक घेतली.

 त्यात अंगणवाड्या बंद असल्याने पर्यायो उपाययोजना करून जिल्हा परिषद शाळांच्या मदतीने संबंधितांना आहार देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदांच्या आवारात भरणाऱ्या

 एक हजार ७९१ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना झेडपी शाळांवरील शिक्षक दररोज एक तास शिकवणार आहेत. स्तनदा माता, गर्भवतीना आहार आशासेविकांमार्फत पुरविला जाणार आहे.

अंगणवाड्यांची स्थिती

■ एकूण अंगणवाड्या ४,०७६

■ ६ महिने -३ वर्षांपर्यंतची १,०६,८१३

■ ३ ते ६ वर्षांपर्यंतची मुले १,०१,०४१

■ गरोदर महिला

१८,५५१

■ स्तनदा माता

१८,३०८

आशासेविका मदत करतील का?

■ आरोग्य विभागाकडील आशासेविकांच्या मदतीने स्तनदा माता व गर्भवतीसह सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना घरपोच आहार देण्याचे नियोजन आहे. 

पण, राज्य सरकारने आशासेविकांचे मानधन वाढीचा निर्णय जाहीर करूनही शासन निर्णय न निघाल्याने त्यांनीही १२ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. 

त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांची कामे आशासेविका करतील का, याबद्दल संभ्रम आहे. या पाश्र्वभूमीवर आगामी काळात अंगणवाडी सेविका- मदतनीस यांच्या संपामुळे ग्रामीण

 भागातील चिमुकल्यांचे शिक्षणाची व बालक, गर्भवती महिलांचे लसीकरण, स्तनदा माता, गर्भवतींच्या आहाराची गैरसोय होवू शकते. त्यामुळे राज्य सरकारला आता दोन्ही विषय सामोपचाराने मिटवावेच लागणार आहेत.

Post a Comment

0 Comments