google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना; सांगोला येथील तरुणावर FIR

Breaking News

खळबळजनक घटना...लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना; सांगोला येथील तरुणावर FIR

 खळबळजनक घटना...लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,


पुण्यातील घटना; सांगोला येथील तरुणावर FIR

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी सांगोला येथील एका तरुणावर बलात्काराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 21 सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान, नऱ्हे येथील हॉटेल, पंढरपूर, महाबळेश्वर येथे घडला आहे.

याबाबत पुण्यातील चांदणी चौकात राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने मंगळवारी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार चैतन्य महादेव जाधव  (वय-21 रा. सांगोला) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले.

 त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने नऱ्हे,पंढरपूर आणि महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 

पीडित तरुणीने विरोध केला असताना त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून 

ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लाड  करीत आहेत.

Post a Comment

0 Comments