google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक: झोपमोड केल्यामुळे रागाच्या भरात भाडेकरूने केला घरमालकाचा खून ...!

Breaking News

धक्कादायक: झोपमोड केल्यामुळे रागाच्या भरात भाडेकरूने केला घरमालकाचा खून ...!

 धक्कादायक: झोपमोड केल्यामुळे रागाच्या भरात भाडेकरूने केला घरमालकाचा खून ...!


पुणे : पुण्यामधील लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

भाड्याने राहत असलेल्या एका तरुणाने चक्क झोपमोड केल्यामुळे घरमालकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

त्यामुळे सुरक्षतेचा प्रश्न उभा राहत आहे. हडपसर परिसरात गुन्हेगारी फार वाढली आहे. दरम्यान खुनाची घटना हडपसर जवळील उरुळी देवाची भागात घडली आहे. 

घरासमोर घराचा मालक आपल्या दुचाकीचा हॉर्न सारखा वाजवत असल्यामुळे भाडेकरूची झोपमोड झाली याचा राग आल्याने भाडेकरूने थेट घरमालकाची हत्या केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजेंद्र धोत्रे असं आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दादा ज्ञानदेव घुले रा. उरुळी देवाची असं हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे.

 हडपसर येथे दादा यांची चाळ आहे. त्यातील खोल्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत संतोष राहायचा. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिऊन घरात झोपला होता. त्यावेळी घुले यांनी घरासमोर बाईकचा जोरजोरात हॉर्न वाजवला. 

त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून मारहाण केली. या मारहाणीत घुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

रात्र झाली तरी घुले घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी चौकशी सुरु केली असता घुले आणि धोत्रे यांच्यात भांडण झाल्याचे उघडकीस आले. 

व त्यातून घुले यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments