google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

Breaking News

सांगोला न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

 सांगोला न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन


सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार दिनांक ०९/१२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करणेत आलेले आहे. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व मुंबई यांचेकडील आदेशान्वये सदरचे लोकन्यायालय भरविण्यात येणार आहे. 

सदर लोकन्यायालयात या न्यायालयातील दिवाणी दावे, फौजदारी प्रलंबीत खटले, चेक न बठलेल्या १३८ एन. आय. अॅक्टचे खटले, पोटगीचे खटले, 

थकीत विद्युत बीले, न भरलेले प्रकरणे, भारत संचार निगम लि., बँकेची थकीत कर्जे न भरलेले प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच दाखलपूर्व बँकेची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

तरी संबधित पक्षकार बंधुनी तसेच विधीज्ञ यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एस. एम. घुगे, अध्यक्ष, सांगोला तालुका विधी सेवा समीती तथा दिवाणी न्यायाधिश क. स्तर, सांगोला यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments