जय मल्हार क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी सुमितराव चव्हाण यांची निवड
फलटण प्रतिनिधी दि. २६ नोव्हेंबर रोजी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अंकुशराव जाधव
सर यांच्या मार्गदर्शनाखाली सस्तेवाडी
ता. फलटण जि. सातारा येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लोटेवाडी ता. सांगोला जि. सोलापूर येथील सुमितराव चव्हाण
यांची सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी निवड
करण्यात आली. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते सुमितराव चव्हाण यांना निवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले.
दौलत नाना शितोळे यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून सुमितराव चव्हाण ओळखले जातात .
संघटनेच्या स्थापनेपासून दौलत नाना शितोळे यांच्यासोबत राहून समाज संघटीत करून समाजातील गोरगरीब कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
0 Comments