google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...बिबट्या आल्याचे मोबाइल स्टेटसला ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...बिबट्या आल्याचे मोबाइल स्टेटसला ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल

 ब्रेकिंग न्यूज ...बिबट्या आल्याचे मोबाइल स्टेटसला ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल


बिबट्या आल्याचे मोबाइल स्टेटसला ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महूद (मेटकरवाडी) ता.सांगोला येथील शैलेश धनंजय कांबळे याचेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला.

याबाबत, सुग्रीव लिंबा मुंडे (रा. वन वसाहत, सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी शैलेश कांबळे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

चिकमहूद ता. सांगोला येथील तळेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे एकाने मोबाइल स्टेटसला ठेवल्याचा प्रकार काल शनिवारी घडला होता.

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेऊन वन क्षेत्रपाल तुकाराम जाधवर यांनी कर्मचाऱ्यासमवेत ज्यांनी पहिल्यांदा बिबट्या पाहिला त्यास बोलावून त्याच्याकडून माहिती घेतली असता सदर प्रकार अफवा असल्याचे संशय बळावला.

वनपाल सुग्रीव मुंडे यांनी शैलेश कांबळे यास पोलिस स्टेशनला आणून पोलिसासमोर अधिक चौकशी केली.

Post a Comment

0 Comments