google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार शहाजीबापू पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील व्यक्त केली खंत म्हणाले

Breaking News

आमदार शहाजीबापू पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील व्यक्त केली खंत म्हणाले

 आमदार शहाजीबापू पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.


मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील व्यक्त केली खंत म्हणाले

सांगोला : चिकमहूद (ता. सांगोला) गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केला. 

मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने कोणालाही नाराज न करता लोकशाही पद्धतीने व निर्भयपणे तसेच खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक व्हावी, यासाठी आग्रही राहिलो, असे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी प्रयत्न केला. मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने कोणालाही नाराज न करता लोकशाही पद्धतीने व निर्भयपणे तसेच खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक व्हावी, यासाठी आग्रही राहिलो, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 


चिकमहूद हे आमदार शहाजीबापू पाटील यांचे गाव असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

 आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली त्यांच्या स्वतःच्या चिकमहूद गावातील ग्राम पंचायतीसाठी आज रविवारी मतदान सुरू आहे. 

आमदार पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

चिकमहूद हे आमदार शहाजी पाटील यांचे गाव असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

त्यावेळी त्यांनी गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

 सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली त्यांच्या स्वतःच्या चिकमहूद गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे.

 आमदार पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गेल्या सुमारे तीन-साडेतीन वर्षांच्या काळात सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली आहेत. या विकासकामांची जनता साक्षीदार आहे. 

तालुक्याबरोबरच चिकमहूद गावातही मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली आहेत. गावात कोणतेही विकासाचे काम मागे राहिले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनेलचा सहज विजय होईल.

चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाटील गटाच्या (स्व.) सुभाषनाना पाटील ग्रामविकास आघाडीकडून शोभा सुरेश कदम या सरपंच पदासाठी उमेदवार आहेत.

 त्यांच्या विरोधात तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या सुप्रिया सुभाष भोसले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे.

ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांतून पंधरा सदस्य पदांच्या जागांसाठी एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी

 आज सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील सर्वच प्रभागात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. गावठाणातील प्रभाग चारच्या समोर सकाळी साडेसातपासून मतदारांची भली मोठी रांग लागली आहे.

Post a Comment

0 Comments