रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी विद्यामंदिर हायस्कूल एखतपुर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
सांगोला :- संविधान दिन साजरा करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र माने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या भारत देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली.
हे संविधान लिहिण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागला त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र 'संविधान दिन' साजरा केला जातो.
भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे.आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत.
या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात.
शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो.
देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवणे गावचे प्रगतशील बागायतदार श्री प्रताप पाटील हे उपस्थित होते l
0 Comments