google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार ! व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझे नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे नाहीतर तुझे खरे नाही असे म्हणून छळ केल्याप्रकरणी छळास कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील तरुणाची आत्महत्या;

Breaking News

धक्कादायक प्रकार ! व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझे नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे नाहीतर तुझे खरे नाही असे म्हणून छळ केल्याप्रकरणी छळास कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील तरुणाची आत्महत्या;

 धक्कादायक प्रकार ! व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझे नावे असलेली ५७ गुंठे


जमीन आम्हाला दे नाहीतर तुझे खरे नाही असे म्हणून छळ केल्याप्रकरणी छळास कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील तरुणाची आत्महत्या;  

मंगळवेढा :- व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझे नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे नाहीतर तुझे खरे नाही असे म्हणून छळ केल्याप्रकरणी छळास कंटाळून

राम ज्ञानेश्वर मेटकरी (वय २७) याने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी देवयानी कुंडलिक शेंबडे, राहुल शेंबडे (रा. भिमनगर, मंगळवेढ), सचिन संगम मस्के, रा. डोंगरगांव या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत राम ज्ञानेश्वर मेटकरी हा फिर्यादी महिला प्रभावती मेटकरी (वय ५० रा. डोंगरगांव) यांचा मुलगा असून दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० च्या दरम्यान

वरील आरोपीने व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझे नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे नाहीतर तुझे काही खरे नाही, तुला व तुझ्या आईला तुरुंगात टाकतो अशी धमकी दिली.

तसेच फिर्यादीचे मुलाचे आरोपी सचिन मस्के यांच्याकडे असलेले पैसे त्यास मागितले त्यावेळी आरोपीने मयतास हाताने मारहाण केली. त्यामुळे संतापून दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वा. वरील तीघा आरोपींच्या त्रासाला कंटाळून

विषारी औषध पिवून राम मेटकरी याने राहते घरी डोंगरगांव येथे आत्महत्या केली असल्याचे प्रभावती मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments