google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले

 सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले


मागील वर्षीची ४३ कोटी ९२ लाख, तर अगोदरच्या काही वर्षांचे ३२ कोटी २५ लाख रुपये असे ७६ कोटी १६ लाख रुपये ऊस उत्पादकांचे साखर कारखान्यांनी अडकवले आहेत. जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिली नसली तरी एकाही साखर कारखान्यांवर कारवाई झालेली नाही. 

साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस आणल्यानंतर किमान १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, असा एफआरपी कायदा आहे. मात्र जिल्ह्यातील स्वामी समर्थ व आर्यन साखर कारखान्यांनी २०१४-१५ च्या गाळपाला आणलेल्या उसाचे पैसे थकविले आहेत.

कारखाना  (रक्कम)

मकाई  (२४ कोटी ५१ लाख)

स्वामी समर्थ  (९ कोटी ७ लाख)

आर्यन शुगर  (६ कोटी ९७ लाख)

शंकर सहकारी  (१२ कोटी ८३ लाख)

श्री. आदिनाथ  (१ कोटी ५४ लाख)

वसंतराव काळे  (१९ कोटी ६६ लाख)

मातोश्री लक्ष्मी  (८१ लाख)

धाराशिव, सांगोला  (७८ लाख)

Post a Comment

0 Comments