google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची विभागीय पथका मार्फत होणार तपासणी, विवीध संकलनांकडील तपासणी आदेशामुळे उडाली खळबळ

Breaking News

सांगोला भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची विभागीय पथका मार्फत होणार तपासणी, विवीध संकलनांकडील तपासणी आदेशामुळे उडाली खळबळ

 सांगोला भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची विभागीय पथका


मार्फत होणार तपासणी, विवीध संकलनांकडील तपासणी आदेशामुळे उडाली खळबळ

कार्यालयातील वाढत्या तक्रारी आणि प्रलंबीत कामांच्या अनुषंगाने तपासणी अहवाल सादर करण्याचे पथकाला आदेश

सांगोला / वसीम शेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सांगोला येथील विवीध नोंदवह्या आणि प्रत्यक्षातील कामकाजाची विभागीय स्तरावरील पथकामार्फत तपासणी होणार 

असून तसे आदेश उप संचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे यांनी पथकातील संबंधीत अधिकारी वर्गाला दि. १० ऑक्टोबर रोजी जारी केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, सांगोला येथील अधिकारी

 आणि कर्मचान्यांमार्फत होणारे दैनंदिन कामकाज हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेचा विषय बनला होता. येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना उद्धट उडवा उडवीची उत्तरे देऊन कामे जाणून बुजून प्रलंबीत ठेवत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या

 माध्यमांतून बातम्याही प्रसिध्द झाल्या परंतु तक्रारीचे निराकरण मात्र आजतागायत कधीही झालेलेनव्हते, कार्यालयीन प्रमुखांकडून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन या कार्यालयात बिनबोभाटपणे झाल्याचे दिसून येते. 

दरम्यान दप्तर तपासणीच्या आलेल्या आदेशाने एकच खळबळ माजली असून या तपासणी आणि तपासणी अहवालाच्या सादरीकरणा पश्चात होणान्या कारवाईबाबत जाणकारांतून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.उप अधीक्षक भूमि अभिलेख 

सांगोता या कार्यालयाबाबत वाढत्कारी आणि प्रतीकांच्या अनुपासणी कामी श्री. सूर्यकांत मोरे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचे नियंत्रणाखाली तपासणी पथकाचे सदस्य म्हणून श्री. संजय धोंगडे

 (उप अधीक्षक भूमि अभिलेख, बारामती) २) श्री. सुधीर पाटील (शिरस्तेदार, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे) ३) श्री. सोमनाथ कुंभार (मुख्यालय हाय्यक उप अधीक्षक भूमि अभिलेख, बारामती) आणि ४) श्री. सचिन गवारी (न. भू. शिरस्तेदार उप अधीक्षक भूमि अभिलेख,

मनपासणीचे कर्तव्य बजावणार आहेत. उपरोक्त नमूद अधिकारी व कर्मचारी हे नोव्हेंबर २०३३ मधील पहिल्या आठवड्यात या कार्यालयातील भूमापन, नागरी भूमापन व एकत्रीकरण या संकलना कडील प्रलंबीत कामकाजाबाबत सविस्तर तपासणी करणार आहेत,

 तसेच मोजणी प्रकरणे, फेरफार प्रकरणे इत्यादी क्रमाने निघतात की नाही यासोबतच तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने संबंधीत प्रकरणे याबाबत वस्तुनिष्ठ टिपणी तयार करणार आहेत

 सदनंतर पथक प्रमुख श्री. संजय धोंगडे हे त्यांचे स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल १५ नोव्हेंबर २०२३ अखेर उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांच्या कार्यालयाकडे सादर करणार आहेत. ही तपासणी झाले नंतर प्रशासनाच्या कारवाई कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments