कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गरोदर माता तपासणी शिबीर संपन्न...
कोळे/प्रतिनिधी:-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळे ता.सांगोला या ठिकाणी दि.03.10.2023 रोजी गरोदर माता शिबीर आयोजित करण्यात आले.सदर चे शिबीर सकाळी 9 ते 12.30 पर्यंत सुरू होते.यामध्ये प्रामुख्याने 25 गरोदर माता यांची बी.पी शुगर, एच.आय.वी, टी.बी, क्षयरोग, कुष्टरोग, व विविध प्रकारच्या रक्त तपासण्या आणि उपचार करण्यात आले. सदर या शिबिरास कोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.जांभळे,डॉ.दिनेश मोहिते यांच्या उपस्थितीत सिस्टर आतार मॅडम,राणी करांडे,आशा स्वयंसेविका कोळे सुपरवायझर लता आलदर व आशा स्वयंसेविका सविता माळी,गीतांजली शेटे,नकुसा पांढरे, सुवर्णा माळी, शुभांगी मोरे,मीना मोरे, ताहिरा मुलांनी व परिचारक राजू जाधव, व कनिष्ठ सहाय्यक दत्ता करांडे व सर्व गरोदर माता या शिबिरास मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments