google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे वानराच्या हल्ल्यात नागरिक जरवमी खंडोबा मंदिर परिसरात २० ते २५ वानरांचा वावर

Breaking News

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे वानराच्या हल्ल्यात नागरिक जरवमी खंडोबा मंदिर परिसरात २० ते २५ वानरांचा वावर

 सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे वानराच्या हल्ल्यात नागरिक जरवमी खंडोबा मंदिर परिसरात २० ते २५ वानरांचा वावर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 वाटंबरे (ता. सांगोला) येथे वानरांच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. त्यातील एका वानराने दत्तू सुदाम गेजगे (वय ७०) यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाला चावून त्यांना जखमी केल्याची घटना घडली. यावेळी आजूबाजूचे नागरिक ओरडल्याने वानर पळून गेले.

या घटनेनंतर दत्तू गेजगे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ सांगोला येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. वन विभाग अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दवाखान्यामध्ये जाऊन या घटनेचा पंचनामा केला.

 यावेळी त्यांना दत्तूगेजगे यांच्या पायाला वानर चावल्याने बारा ते तेरा टाके पडल्याचे आढळून आले. या घटनेनंतर वाटंबरे गावाचे सरपंच किरण पवार यांनी फोनवरून वन विभागाशी संपर्क साधला. 

वन विभागाचे अधिकारी तानाजी जाधवर यांनी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना वाटंबरे येथे तत्काळ पाठवून दिले. यावेळी या विभागातील कर्मचाऱ्यांना एका वानराला पकडण्यात यश आले.वाटंबरे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी चार ते पाच वानर वास्तव करीत होते. आता त्यांची संख्या वीस ते पंचवीस झाली आहे.

वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते खाण्यासाठी शेतीचेही नुकसान करत आहेत. तसेच खाण्यासाठी नागरी वस्तीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वावरवाढला आहे. ते नागरिक तसेच विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहेत.

 त्यामुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ या कळपातील वानरांना जेरबंद करून वनात सोडून द्यावे, अशी मागणी वाटंबरे ग्रामस्थांमधून होत आहे.

वानराच्या हल्ल्यात जखमी झालेले दत्तू सुदाम गेजगे यांचा मी स्वतः जाऊन पंचनामा करत त्यांचा जबाब घेतलेला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे वन विभागामार्फत त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.

- तुकाराम जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी

Post a Comment

0 Comments