आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर 'बाण' शिवसेनेचा खरा वाघ एकनाथ शिंदे. ते मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर
शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आली, असे म्हणत शहाजीबापू यांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परदेश दौऱ्यावरून घेरले, नंतर वाघनखांवरून प्रश्न उपस्थित केला. शिंदेंवर आदित्य सातत्याने बाण डागताना दिसत आहेत.
पण, वाघनखांवरून केलेल्या प्रश्नानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे. शहाजीबापू यांनी आदित्य ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेंनाही डिवचले आहे.
मुख्यमंत्री शिंदे परदेश दौऱ्यावर जाणार होते. त्यावरून, तुम्ही परदेशात जाऊन काय करणार? अशी टीका आदित्य यांनी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर आदित्य यांनी ये डर अच्छा लगा, असे म्हणत टोला लगावला होता.
शिंदे यांच्या दौऱ्यावरून आदित्य यांनी वाघनखांवरून सरकारला लक्ष्य केले. शिंदे सरकार लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखे काही काळासाठी महाराष्ट्रात आणणार आहे.
त्यावरून आदित्य यांनी सवाल केला की, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का? आदित्य यांनी वाघनखे खरी की खोटी यावर चर्चा करू नये.
वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची आहेत, त्यावर ब्र शब्द बोलू नये. शिवसेनेचा खरा वाघ एकनाथ शिंदे. ते मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आली, असे म्हणत शहाजीबापू यांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
घरात कोंडून घेऊन कुलूप लावून बसण्यापेक्षा विदेश दौरा केलेला कधीही बरा. राज्याची प्रगती करण्यासाठी विदेश दौरा गरजेचा असतो. ते प्रगतीचे लक्षण आहे, असे म्हणत शहाजीबापू यांनी आदित्य यांच्यावर हल्लाबोल केला.
0 Comments