सांगोला तालुक्यात संतश्रेष्ठ बाळूमामा महाराज यांचा बलवडी वझरे
येथे जन्मोत्सव सोहळा संपन्न..भगवान शंकराचा अवतार म्हणजे बाळूमामा -ह भ प जयश्री ताई तिकोंडे
नाझरे प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
संताचा व भगवंताचा अवतार तुम्हा आम्हाला कळणार नाही परंतु मनापासून नामस्मरण चिंतन केल्यास थोडाफार कळेल व आज बलवडी व झरे येथील डॉ शिवाजीराव ढोबळे यांच्या शेताच्या माळरानावर भरलेली
जत्रा कोणाची व तो तळ कोणाचा असेल तर तो आमचा बाळूमामांचा असेल व आज जन्मोत्सव सोहळा येथे होत आहे म्हणजे सुवर्णयोग आहे असे ह भ प जयश्रीताई तिकोंडे यांनी मामाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या कीर्तनरुपी सेवेत सांगितले
यावेळी मामांच्या लीला विषयी अनेक प्रसंग सांगितले यापैकी लहानपणी बाळूमामा काट्यावर विश्रांती घेणे व दोन्ही पायाने मागे मागे उड्या मारणे वृक्षाच्या शेंड्यावर बसून शिखर आहे असे सांगणे तसेच अकोळ या गावी
एका धनगर कुटुंबात शंकर भगवान यांनी अद्वितीय मायेचा स्वीकार करून मायाप्पा व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी मामांचा जन्म झाला व त्यांच्या वडिलांनी जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांच्याकडे मामा चाकरीला ठेवले व तेथे त्यांना छिद्र पडलेली थाळी व तांब्या दिला
व रात्रीची वेळ दिवसभर मामा मेंढरे राखून दमलेले झोपले व शेठजींच्या आईने गोठ्यात प्रवेश केला त्यावेळी तिला नवल पूर्ण दिसले दिवा नसूनही लख्ख प्रकाश पडला होता त्यामुळे त्या थाळीतून प्रकाश दिसला
व ही वस्तू सामान्य नाही असे समजून तिने देवघरात पूजेस ठेवले व शेठजी ची प्रगती झाली परंतु थाळी परत घेतल्यामुळे मामाने काम सोडले व मुळे महाराज हे त्यांचे गुरु होते व मामा पूर्णपणे शाकाहारी होते गळ्यात लिंग आहे
व त्यांनी अनेक लोकांना सन्मार्गाला लावले व भक्ती प्रेमाने चाललेले भजन त्यांना फार आवडे असे हे थोर संत होते व त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या असेही जयश्रीताई यांनी यावेळी सांगितले दुपारी चार वाजून 23 मिनिटांनी महिलांनी पाळणा म्हटला व पुष्पवृष्टी करण्यात आली
यावेळी पालखी क्रमांक 18 चे कारभारी भीमराव जलग प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख उपकारभारी गजानन करे पुजारी दादा मिटकरी पत्रकार रविराज शेटे माजी प्राचार्य सुबराव बंडगर आबा सांगोलकर येथील भजनी मंडळ महिला असंख्य मामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाआरती गजी ढोल ओव्या व महाप्रसाद वाटप करण्यात आला
0 Comments