सांगोला तालुक्यात मराठा आरक्षणाची धग; एखतपुर येथे साखळी उपोषणास प्रारंभ
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२) :- मराठा आरक्षणाची धग वाढली आहे.
गुरुवारी सकाळपासून मराठा समाज बांधवानी साखळी उपोषणाला सांगोला तालुक्यातील एखतपुर येथे सुरुवात केली आहे.
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करत असल्याचे एखतपुर येथे मराठाबांधवांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
सोलापूर जिल्ह्यासह सर्वच तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २०० हुन अधिक गावात राजकीय नेत्यांना व मंत्र्याना गावबंदी केल्याची माहिती सकल मराठासमाजाच्या वतीनं देण्यात आली.
एखतपुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत जालन्याहून आदेश येत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
जरांगे पाटील यांच्या आदेशाची अंमलबजावणीकरण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा एकवटला आहे. जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी २५ ऑक्टोबरपासून पुढील आदेश येइपर्यंत साखळी उपोषण सुरू
करण्यात येत आहे. गावपातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना (आमदार, खासदार, मंत्री) यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेवू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे हून अधिक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


0 Comments