सांगोला तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे आंदोलन....
सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडणार - किरण साठे
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी : सांगोला : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सांगोला तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठवुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी राज्य समन्वयक अजित साठे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, महूद ग्रामपंचायत सदस्य धनाजी कांबळे,तालुका प्रसिद्धीप्रमुख व गायगव्हान ग्रामपंचायत सदस्य समाधान कांबळे,महूद शहराध्यक्ष कुमार कांबळे,रफिक मुलाणी,
नवनाथ ननावरे,आनंद मिसाळ,विलास कांबळे,आदित्य कांबळे,अशोक गवळी समाधान कांबळे,आनंद मिसाळ,सचिन कांबळे,अशोक बुचडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदन महसूल नायब तहसीलदार गजानन बेले यांनी स्वीकारले
आंदोलनप्रसंगी महाराष्ट्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा.कर्जमाफी योजनेमध्ये दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांचे दर कमी करण्यात यावेत.
तसेच शेतीची रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा भासवत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.दुधाचे दरामध्ये वाढ करण्यात यावी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा.सरकारी शाळेचे खाजगीकरण तात्काळ थांबविण्यात यावे.
सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीयांच्या नोंदी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात याव्यात.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध योजनांची थकित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावी.
दुष्काळ ग्रस्त भागात तात्काळ जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. गॅस,पेट्रोल,डिझेल,तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्यात.
महाराष्ट्र राज्यातील सर्वच धरणातील पाणी उद्योगाला न देता पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे.या मागण्या करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. संबंधित मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिला आहे.





0 Comments