सांगोला तालुक्यातील घटना...डाळिंब बागेतील सुमारे 1 हजार डाळिंब झाडे तोडून लाखो रूपयांचे नुकसान
सांगोला/प्रतिनिधी ः (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
गळवेवाडी, ता.सांगोला येथे शेतातील 1 हजार डाळिंब झाडे तोडून नुकसान केले असल्याची घटना मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी घडली.
याबाबत माहिती अशी की फिर्यादी कोडींबा तुकाराम गळवे यांच्या डोंगरगांव हद्दीतील गट नं. 102 मधील एक वर्षापूर्वी 2 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली सुमारे 1 हजार डाळिंब झाडे आरोपी शिवाजी सदाशिव गळवे,
विकास अशोक गळवे, सिद्धनाथ प्रकाश गळवे, गोपाळ ढगे सर्व रा.गळवेवाडी, ता.सांगोला, जि.सोलापूर यांनी रात्रीच्या सुमारास येऊन आमच्या शेतातील लागवड केलेली
डाळिंबाची झाडे तसेच ठिबक सिंचनची पाईपलाईन कुर्हाडीने तोडून व उखडून टाकून संपूर्ण डाळिंब बाग उद्ध्वस्त केली आहे. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार फिर्यादी कोंडिबा तुकाराम गळवे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
या नुकसानीचा पंचनामा आज तालुका कृषी अधिकारी, गावकामगार तलाठी करणार असून पंचनाम्यानंतरच या नुकसानीचा अंदाज येईल असे सांगण्यात फिर्यादीकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments