कोळे ता.सांगोला आगामी काळातील गणेशोत्सवाच्या सणा निमित्त अटी व नियम, सूचना यासाठी सांगोला पोलिस स्टेशन चे
पोलिस निरीक्षक श्री.अनंत कुलकर्णी साहेब यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन केले.
कोळे / प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
कोळे गावामध्ये मोठ-मोठ्या वाड्या- वस्त्या मध्ये सर्व प्रकारे मिळून 21 गणपती मंडळे आहेत. गावामध्ये बहुतांश प्रमाणात गणपती मंडळांचे अध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे, कोळे या गावांमध्ये हिंदू - मुस्लिम बंधू भावाचे नाते एकदम मजबूत आहे.
त्यामुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन होते. संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये शांतता आणि जातीय सलोखा असलेले असे वैशिष्ट्यपूर्ण कोळे हे गाव आहे.
पुढे बोलत असताना सचिन देशमुख हे म्हणाले की पोलिस प्रशासनास कोणत्याही प्रकारे ताण अथवा त्रास होऊ देणार नाही.आम्ही सर्व कोळे ग्रामस्थ गणेश उत्सव हा सण उत्साहात साजरा करतो अशी ग्वाही दिली.
दि.13.09.2023 रोजी सांगोला पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री. अनंत कुलकर्णी साहेब हे
या वर्षी गणेशोत्सव सण व कार्यक्रमासंदर्भात शासनाने ज्या काही घालून दिलेल्या अटी व शर्ती बद्दल कोळे व पंचक्रोशीतील जे काही छोटे - मोठे गणपती मंडळे आहेत त्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाधिकारी व कोळे ग्रामस्थ यांची बैठक
लक्ष्मी मंदिर कोळे ता.सांगोला या ठिकाणी सायंकाळीं 6 वाजता संपन्न झाली. यामध्ये प्रामुख्याने साहेबांनी सांगितले की कोणत्याही समाजाची भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे किंवा फोटो असे देखावे सादर करू नका.
आपल्या गावातील शांतता बाधित होतील अशी कोणतेही घटना होऊ देवू नका.जेव्हा आपण सण उत्सव साजरे करतो त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो.पण ध्वनि प्रदूषण करणारी अशी वाद्ये डॉल्बी याचा आवाज शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमानुसार मर्यादित असावा.,
त्या डॉल्बीची व वाद्याचा आवाज मर्यादापेक्षा ,नियमापेक्षा जास्त असेल व सर्वसामान्य जनतेला त्रास होत असेल तर तो डॉल्बी व वाद्ये तात्काळ जप्त करून संबंधित गणेश मंडळावर व डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
संध्याकाळी दहा वाजले नंतर कोणतीही वाद्ये अथवा लाउड स्पीकर लावू नये. यामुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदुषण सामाजिक पर्यावरणाची हानी होऊ न देणे याची काळजी सर्व गणेश मंडळांनी घ्यायची आहे.गणेशोत्सव मध्ये कोणताही
कार्यक्रम असेल तर पोलिसांची परवानगी आवश्यक घ्यावी. अशा सर्व सूचना व नियम पोलिस निरीक्षक श्री.अनंत कुलकर्णी साहेब यांनी सांगितलेले आहेत.या सदरच्या बैठकीदरम्यान उपस्थित असलेले
जि.प.सदस्य सचिन देशमुख, संतोष करांडे, (म. गां.तंटामुक्तीचे अध्यक्ष)भारत इमडे. वंदनाताई सरगर (सामाजिक कार्यकर्त्या) व कोळे बिट चे सर्व पोलीस अधिकारी व पोलिस पाटिल आणि विविध पक्षाचे पदाधिकारी नेतेमंडळी व कोळे ग्रामस्थ या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments