धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा.
मोठ्या भावाने उसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या रागातून त्याच्या 14 वर्षीय लहान भावाचे अपहरण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, संताप व्यक्त केला जात आहे.
प्रकाश बोबडे (रा. माटेगाव, ता. पुर्णा) यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी विविध तपास पथके नियुक्त केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात बालाजी चव्हाण आणि नरेश जाधव या दोघंची नावे समोर आली. दोन्ही आरोपी पसार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांनी शिताफीने अटक केली.
दोघांनी 14 वर्षीय बालकास त्याचा मोठा भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हात-पाय आणि तोंड बांधून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे नेले. त्याच ठिकाणी त्याचा खून करून मृतदेह टाकून पसार झाले होते.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना अटक केली आहे. केवळ 35 हजार रुपयांसाठी या दोन जणांनी 14 वर्षीय बालकास अपहरण करून त्याची हत्या केल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.
0 Comments