मोठी बातमी..मराठा आरक्षण मागणीला शेकापचा पाठिंबा,
पाठिंब्यासाठी डॉ बाबासाहेब देशमुख अंतरवली सराटीमध्ये
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने आपला पाठिंबा दिला आहे. शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण करत असलेलय मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की आंदोलकांवर काही दिवसांपूर्वी लाठीचार्जची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तर आपण तो देऊ.
ते पुढे म्हणाले की माझी मराठा आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.


0 Comments