सांगोला एस टी आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा
शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय मनस्ताप
(समता नगरी न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )
सांगोला तालुका प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यातील अनेक गावांमधुन तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने मुले-मुली एस टी चा पास काढून प्रवास करत आहेत.
परंतु सांगोला एस टी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारों विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बसच्या आसन क्षमतेपेक्षा दुप्पट- तिप्पट प्रवासी (मुले,मुली) एकाच एसटी मध्ये जनावरासारखे कोंबून वहातुक केली जात आहे.
त्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासाठी सांगोला तालुक्यातून सांगोला येथे येणाऱ्या मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एसटी बसेस मध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने हजारों मुलींना दररोज ताटकळत उभे राहून एसटी बस मध्ये प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यातील कोणत्या गावातील किती मुले-मुलींनी मासिक पास काढले आहेत. याची नोंद (माहिती) आगाराच्या रेकॉर्डला असल्यामुळे तालुक्यातील शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस चे योग्य प्रकारे नियोजन करणे सहज शक्य आहे.
परंतु सांगोला आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्यातील नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना याचा फटका बसत आहे.एका एसटी बस मध्ये आसन क्षमतेच्या दुप्पट-तिप्पटीने प्रवासी भरून प्रवासी वाहतूक केली जात आहे.अश्या प्रकारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करतात. परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आजतागायत एसटी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या बसेसवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. हे दुर्दैवी आहे.
0 Comments